मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्यल्या वेळचे खाणे (ब्रेड रोल्स)

गणपा · · पाककृती
काल सकाळी न्याहारीचा ज्याम कंटाळा आला होता. (अहो स्वतः बनवाव लागत. आयत गिळायला मिळत आसेल आमची ना कशाला?) दुपारी ऑफिस मध्येपण फळांवर वेळ मारुन नेली. संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप. (कोण रे तो म्हणाला सुटलोSSSS ? :W बर इतक्या लवकर सोडीन >:) ). रात्री ९ ला पोटात कावळे ओरडायला लागलेच. मग आता आयत्या वेळी काय कराव बर :? झटपट खिचडी करावी का? पण माझ्या जिभेचे चोचलेच फार त्यामुळे ती आयडिया रद्द [( . फ्रिज उघडुन कच्च्या मालाचा अंदाज घेतला. ब्रेड दिसला. काही तरी असेच मध्यल्या ( ? ) वेळचे खाणे बनवावे ठरवले. पटपट तयारीला लागलो. एक लहान कांदा,टॅमेटो बारीक चिरुन घेतला. नारळ खवलेला होता तो काढला. १ चमचा बडीशेप घेतली/ला. (बडीशेप च लिंग काय ब्वॉ? काही जण खाल्ली म्हणतात तर काही खल्ला. मरो त्याच्याशी काही देणे घेणे नाही.) Image removed. फ्रिजर मधली मसाला, हिरव वाटण (कोथींबीर + हिरवी मिरची + आल +लसुण) लावुन ठेवलेली कोलंबी काढली. तिचे लहान (अंदाजे १ से.मी. लांबीचे) तु़कडे केले. त्यावर थोड लिंबु पिळल. Image removed. कढईत थोड तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतला. Image removed. मग त्यात मसाला लावलेल्या कोलंबीचे तु़कडे टाकुन मस्त परतुन घेतेल. Image removed. लगेच त्यात टॅमेटो, नारळ, बडीशेप,मीठ टाकुन ५-७ मिनिटे खमंग परतुन सारण तयार केल. Image removed. ब्रेडच्या कडा कापुन घेतल्या. एका थाळीत थोड मिठाच पाणी घेतल. एक ब्रेडची स्लाइस त्या पाण्याय बुडवुन लगेच तळ हातावर दाबुन त्यातल पाणी काढुन टाकल. त्या स्लाइस वर तयार सारण टाकुन ब्रेडचा रोल वाळला. Image removed. ब्रेडच्या कडा दाबुन बंद केल्या. Image removed. तव्यावर थोड्याश्या तेलावर हे तयार रोल्स मध्यम आचेवर झटपट तळुन घेतले. Image removed. लवकर लवकर एका रोलचा समस्त मिपाकरांना नैवेद्य दाखवुन बाकीच्यांवर ताव मारला. :D Image removed.

वाचन 25857 प्रतिक्रिया 0