मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कुणि जाल का, सांगाल का..)

चतुरंग · · जे न देखे रवी...
कवी 'अनिल' (आ.रा.देशपांडे) ह्यांची 'कुणि जाल का, सांगाल का' ही अप्रतिम रचना ही आमचे स्फूर्तिस्थान. (अवांतर - हे काव्य पं.वसंतखां देशपांडे ह्यांनी स्वरबध्द केले आहे.) कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'? आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा आधीच कविजनांची बरसात आहे लांबली दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला 'सांभाळुनी' त्या सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी सार्‍या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी चतुरंग

वाचन 9455 प्रतिक्रिया 0