मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

पाषाणभेद · · काथ्याकूट
माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?) लोकांचे एका ओळीच्या कौलांची संख्या व गुणवत्ता बघून मला पण कौलं काढायची हौस झाली. त्यामूळे मी खालील आगामी कौलं माझ्या नावे राखून ठेवत आहे. गरजू कौल लेखक खालील एक एक कौल त्यांच्या एकास एक लेखाच्या बदल्यात माझ्याकडून मागून घेवू शकतात. गरजूंनी या पत्यावर संपर्क साधावा. (आमच्या येथे पाहिजे तसे कौलं पाडून मिळतील. किंमत व्यक्तिपरत्वे/ स्थान परत्वे बदलेले. महाराष्ट्रीय रहिवाश्यांना खास सवलत. त्वरा करा.) १) कौलाचे अनेकवचन काय? कौल च/ कौलं / कौले/ कौल्स इ. २) तुम्हाला मिपा आवडते काय? ३) तुम्हाला मिपा संकेतस्थळ आवडते काय? ४) तुम्हाला (खायची) मिसळपाव आवडते काय? ५) तुम्हाला मिसळ आवडते काय? ६) तुम्हाला मिसळ पावासहीत आवडते काय? ७) तुम्ही श्वास घेतात तेव्हा काय करतात? ८) तुम्ही श्वास घेतात काय? ९) तुम्ही वास घेतात काय? १०) तुम्ही घरी शर्ट वर असतात की बनीयनवर? (महिला मंडळ प्रश्न (यापुढे : ममंप्र) : साडी - गाउन ) ११) तुम्ही अंघोळ करतात काय? १२) तुम्ही रोज अंघोळ करतात काय? १३) तुम्ही चित्रकार / गायक/ नट / नर्तक / पाककला निपूण आहात काय? १४) तुमचा कॉम्पुटर चांगला चालतो का? १५) तुमचा मोबाईल चांगला चालतो का? १६) तुमचा स्वयंपाकाचा गॅस चांगला चालतो का? १७) तुम्हाला साडी आवडते की ड्रेस? (ममंप्र) १८) तुम्ही बसने जाता की रिक्षाने? (भारतीयांसाठी) १९) तुम्ही वॉलमार्ट मधून गव्हाचे पिठ आणतात की दुसरीकडून आणतात? (अनिवासी भारतीयांसाठी) २०) तुम्हाला भविष्य पहायला आवडते का? व का? (उत्सूकांसाठी) २१) महाराष्ट्र हा शब्द कसा बनला. २२) भारत हा शब्द कसा बनला. २३) तुम्हाला काका / काकू म्हटलेले आवडते का? २४) तुम्ही ट्रक चालवता काय? २५) आपण सगळे लेख वाचतात काय? २६) वेळ जात नाही म्हणून कौल काढावा काय? २७) कौल काढल्यावे वेळ जातो (टाईमपास) जातो काय? २८) वेळ जाणे म्हणजे काय? २९) या कौलाला (प्रत्यू)त्तर द्यायचे काय? अशाच प्रकारे मिक्स अँन्ड मॅच करून मला पाककृतीत पण पंचविशी/ पन्नाशी/ शंभरावी/ हजारावी गाठायची आहे.

वाचन 2489 प्रतिक्रिया 0