मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुनीतः एक प्रयत्न

ऋषिकेश · · जे न देखे रवी...
वृत्तबद्ध रचना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मलातरी हे सुनीत फसल्यासारखे वाटतेय पण तरीही तुमच्या अभिप्रायांच्या प्रतिक्षेत आहे. सर्वांची करतो झटून कामे विचारे न कोणी मला पूर्णत्व एक मागणीस असता दूजी वसे अंतरा | साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा लागे मी च जळी स्थळी अन तरी रात्री तिथे हा बरा || म्हातारी असते जर्जर तशी फिट्ट तिला मी करी वैद्य'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी | अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही || धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का | अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, विचारले कोण मी || देव्हार्‍यात असेन कारण कि मी कामास आहे बरा रामा नाहि असे वदून दमलो मी राम आहे खरा || ऋषिकेश

वाचन 2655 प्रतिक्रिया 0