मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संत्र्याचा मुरांबा (Orange Marmalade)

दिपाली पाटिल · · पाककृती
टिव्ही (foodnetwork) बघता बघता मिळालेली पाकृ....रंग फारच सुंदर येतो या मुरांब्याचा... Image removed. साहित्यः ४ मोठी संत्री (मी अमेरिकन नेवल ऑरेंजेस घेतली होती.), मार्मालेडसाठी संत्री आणि लिंबु सालासकटच घ्यावीत, जर सालांचा कडवटपणा नसेल आवडत तर संत्री हलक्या हाताने वरवरचा नारंगी भाग बारिक किसणीने किसुन घ्या, पांढरा भाग घेऊ नये, तोच भाग जास्त कडवट असतो, मग तीच संत्री सोलुन वापरा आणि किसलेली नारंगी साल ही वापरा.पण सालींची चवही छान येते. २ लिंबं अडिच-तीन कप साखर(गोड जसं हवं तशी कमी-जास्त घालु शकता.) अडिच कप पाणी Image removed. कृती: संत्री , लिंबाचे उभे चार भाग करुन पातळ काप करुन घ्या. जेव्हढे पातळ तेव्हढे छान... आता एका जाड बुडाच्या पातेल्यात हे काप आणि पाणी घालुन एक दणदणीत वाफ येईपर्यंत अंदाजे १०-१५ मि. शिजवा. मधुन-मधुन हलवत राहणे खुप महत्त्वाचे आहे. आता हे मिश्रण आंचेवरुन काढुन बाजुला ठेवा आणि त्यात साखर विरघळेपर्यंत मिसळा. आता झाकण ठेवुन हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवुन द्या. आता सकाळी मिश्रण परत अगदी कमी आंचेवर झाकण न ठेवता एक ते दीड तास शिजवत ठेवा.... मिश्रण जर फार पातळ असेल तर परत शिजवत ठेवा आणि जर आधीच घट्ट वाटत असेल तर आंच बंद करुन बाजूला ठेवा, हे बर्‍याचदा संत्री-लिंबांवर अवलंबून असतं. मुरांबा कच्चा ठेवु नये नाहीतर लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि जास्त झाला तरी ही फार चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे शेवटच्या १/२ तासात मिश्रण सारखे हलवत रहावे आणि आंचपण मोठी ठेवू नये. जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडा संत्र्याचा रस टाकावा. बनवुन झाला की हवाबंद डब्यात भरुन बाहेर किंवा फ्रिज मधे ठेवा. मी बाहेरच ठेवला आहे अजुन तरी खराब नाही झालाय पण खात्री नसेल तर फ्रिज मधेच ठेवावा. ४ संत्र्यांचा मुरांबापण खुप होतो.मी अतिउत्साहाने ४ संत्री घेतले होते.. :D सकाळी-सकाळी टोस्टवर थोडे बटर आणि हा मुरांबा खुप छान लागतो.... Image removed.

वाचन 9719 प्रतिक्रिया 0