मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भय इथले संपत नाही.

अभिज्ञ · · काथ्याकूट
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार पुण्यात स्वाईन फ्लु ने दहावा बळी घेतला असून संपुर्ण देशात एकंदर १७ जण ह्या रोगाला बळी पडले आहेत व अनेक जण उपचार घेत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या १७ पैंकि १३ बळी हे महाराष्ट्रात व त्यातकरून १० पुणे, २ मुंबई व १ नाशिक अशी परिस्थिती आहे. हे सर्व पाहता काहि गोष्टींचा तर्क नीट लागत नाही व बरेच प्रश्न पडत आहेत. १. देशभरात अशी साथ असताना किंबहुना पुण्या आधीच हा रोग हैद्राबाद/बंगलोर अशा ठिकाणी पोहोचला होता तरी देखील जास्त बळी हे पुण्यातच कसे काय पडत आहेत? ससून रुग्णालय खरोखरच नीट काळजी घेते आहे कि नाहि? २. पुण्यातील प्रशासनाने एकंदरीतच हे प्रकरण नीटसे वा पुरेशा गांभीर्याने हाताळलेले नाहि? ३. मिडीयावर व जालावर इतरत्र ह्या विषयी रोज माहिती दिली जात असून देखील त्याने लोकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. टेमिफ्लु घ्यावी कि नाहि, चेह-यावर नक्की कुठला मास्क लावावा, तो नक्की किती तासाने बदलावा, तो कुठे उपलब्ध असू शकेल, सर्वसामान्यांना तो सहज मिळावा म्हणून सरकारने काय व्यवस्था केली आहे हे असे असंख्य प्रश्न पडत आहेत. ४.काल काही वृत्तवाहिन्यांवर आयुर्वेदिक उपाय दाखवले जात होते ते कितपत योग्य आहेत? आरोग्य मंत्रालयाची त्याबाबत भुमिका काय आहे? ५. दहिहंडी ऊत्सव रद्द होण्याच्या बातम्या ऐकण्यात असल्या तरी टिव्ही वर ब-याच राजकीय पुढा-यांच्या दहिहंडी कार्यक्रमाच्या जाहीराती सर्रास दिसत आहेत. ६. शाळा बंद करण्याच्या निर्णयाबद्दल देखील कुठलिहि स्प्ष्ट भुमिका सरकार घेताना दिसत नाही. उलट "राखीचे स्वयंवर" असल्या सारखे ह्या विषयावर लोकांचे एसएमएस मागविण्याचा फाजीलपणा मुंबईतील आयुक्त करत आहेत. ७.मुळात सरकारने ह्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून सर्व व्रूत्तपत्रात सविस्तर माहीती द्यायला हवी होती.अजूनही तो प्रकार झालेला दिसत नाही. सेल,डिस्काउंट वगैरेचे अमिष दाखवून गर्दी करणे टाळावे अशा सुचना असताना देखील आजच्या टाईम्स ऑफ ईंडियाच्या संपुर्ण पहिल्या पानावर एका मॉलची भव्य सेलची मोठी जाहिरात आहे. ह्यावर कोणाचे बंधन दिसत नाही. ८.चंद्रकांत दळवींच्या नुसार पुण्यात अजूनही आणिबाणी सदृष परिस्थिती नाही आहे? नक्की किती लोक बळि पडल्यावर सरकार पुण्यात आणिबाणी लागू करणार आहे? हे सर्व पाहता आता असा प्रश्न पडू लागला आहे की भारत सरकार/महाराष्ट्र सरकार/मुंबई-पुणे स्थानिक प्रशासन व राजकीय पक्ष ह्याबाबत पुरेसे गंभीर आहेत कि नाहित?

वाचन 12427 प्रतिक्रिया 0