मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चले जाव!

विकास · · काथ्याकूट
आज ऑगस्ट ९. ६७ वर्षांपुर्वी आजच्या दिवशी मुबईतील ऑगस्ट क्रांतीमैदानावर अरूणा असफली यांनी झेंडा उंचावला आणि ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध चलेजाव ची घोषणा झाली. आज हा चर्चा प्रस्ताव केवळ विंदांच्या भाषेत "इतिहासाचे अवजड ओझे घेऊन डोक्यावर ना नाचा" या उद्देशानेच म्हणजे केवळ उर भरून येऊन लिहीण्यासाठीचा नाही आहे. त्यावेळेस कोण बरोबर आणि कोण चूक, चळवळ यशस्वी होती का अयशस्वी वगैरेचा काथ्याकुट करायला देखील नाही आहे. मात्र विंदांच्या त्याच काव्याच्या ज्या पुढच्या ओळी आहेत, "करा पदस्थल त्यावर आणिक चढून त्यावर भविष्य वाचा" या हेतूने आहे. लवकरच ब्रिटीश जाऊन आणि स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. (ढोबळ मानाने) तीन चतुर्थांश विरुद्ध एक चतुर्थांश असे १५ ऑगस्ट १९४७ चे दोन तुकडे पाहीले तर नक्किच आपल्या ३/४ने खूप काही मिळवले असे म्हणता येते आणि त्याबद्दल अभिमानपण वाटावा अशी नक्कीच परीस्थिती आहे. पण दुसरीकडे अशा बर्‍याच गोष्टी आजही आपण कुठेतरी कशाच्या तरी विरुद्ध लढतच राहीलो आहोतः तनाने अथवा मनाने अथवा धनाने. हे मी केवळ व्यक्तिगत म्हणत नाही आहे तर अगदी समाज म्हणून पण बोलत आहे. जहॉं डाल डाल पर सोने की चिडीयॉ करती है बसेरा, असे म्हणायच्या ऐवजी "जहाँ डाल डाल के भाव सोने के, आम आदमी भी कैसे करे बसेरा" अशी काही तरी अवस्था आहे. आणि हे एकच उदाहरण आहे.... तरी देखील गोष्टी चांगल्या सारख्या बदलू शकतील, आपण विकसीत राष्ट्रपण होऊ, बलसागर भारत होऊ आणि विश्वात पण शोभून राहू, जर आपण ...ला चलेजाव म्हणले तर. तर मंडळी आता सांगा आजच्या घडीला नक्की तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते की त्याला आपल्या देशातून, राज्यातून, समाजातून आणि स्वत:तून "चले जाव" म्हणायची गरज आहे? (आणि हो, हा लेख सगळ्या मिपासदस्यांसाठी आहे. कृपया, "आम्ही", "तुम्ही", "इकडचे", "तिकडचे" करू नये ही विनंती!)

वाचन 5708 प्रतिक्रिया 0