मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फक्त अनिवासी भारतीयांसाठी - नवा धागा

मुक्तसुनीत · · काथ्याकूट
वाचकांच्या सोयीसाठी नवा धागा उघडत आहे. जुन्या धाग्यासाठी पहा : http://www.misalpav.com/node/8846 सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती. तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते. आणि परदेशी नागरीक: मूळचे, म्हणजे जन्मतः भारतीय, परंतु सध्या परदेशी नागरीक) प्रश्नः समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ? येऊ द्यात. माझे उत्तरः मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन. तुमचे काय ?

वाचन 7718 प्रतिक्रिया 0