मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पट्टी सामोसा

चकली · · पाककृती
Taxonomy upgrade extras
मला खूप आवडणारा पदार्थ : पट्टी सामोसा साहित्य: २ वाट्या मैदा १ वाटी बेसन मोहन घालायला ४ चमचे तेल १ ते दिड वाटी मटार २ बटाटे ३-४ मीरच्या पाउण वाटी ओले खोबरे फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद १ चमचा गरम मसाला १ चमचा लिंबू रस मीठ तळण्यासाठी तेल कृती: १) सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ४-५ चमचे तेल कडकडीत गरम करावे आणि पिठाला मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पिठ घट्टसर मळावे व झाकून ठेवावे. २) बटाटे सोलून त्याच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी त्यात मटार आणि बटाटे घालून परतावे. मध्यम आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे. बटाटे व मटार शिजले कि त्यात ओले खोबरे, गरम मसाला, मीठ, लिंबू रस घालून ढवळावे. ३) भिजवलेल्या पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पातळसर पोळ्या लाटाव्यात. प्रत्येक पोळी फक्त ४-४ सेकंद भाजावी. अशा प्रकारे पोळ्या भाजून घेतल्याने समोश्यावर फुगवटे कमी येतात. ४) १/२ वाटी कणिक किंवा मैदा घेउन त्याची घट्टसर पेस्ट बनवावी. भाजलेल्या प्रत्येक पोळीचे सुरीने दोन अर्धगोलाकार भाग करावेत. अर्धगोलाच्या दोन बाजू पेस्टने जोडून कोन बनावावा त्यात १-२ चमचे भाजी भरून आधी १ बाजू आत मुडपावी दुसर्या बाजूला पेस्ट लावून ती बाजू दुमडून चिकटवावी . त्रिकोणी समोसे मध्यम आचेवर तळून काढावे. हे सामोसे चिंचगूळाच्या चटणीबरोबर छान लागतात. टीप: १) आवडीनुसार तिखटपणा कमीजास्त करावा. फोटो

वाचन 11022 प्रतिक्रिया 0