मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा पुन्हा..........काहि चमत्कारिक अनुभव.

अभिज्ञ · · जनातलं, मनातलं
मि काहि वयाने फ़ार मोठा नाही,परन्तु अत्तापर्यन्त बरेचसे गमतिदार अनुभव माझ्या वाटेला आले आहेत. पण हेच अनुभव जर पुन्हा पुन्हा य़ायला लागतात तेन्व्हा मात्र हे काहितरि वेगळॆच घडते आहे असे लक्शात येते. मिच मुर्ख का बनतो असा मला नेहमिच प्रश्ना पडतो. त्यातलेच हे काहि चमत्कारिक अनुभव............ (अनुभव १) एखाद्याने होटेलात जावे आणि लगेच वेटरने येउन सम्पुर्ना होटेल झाडायला घ्यावे,असा अनुभव प्रत्येकास कधि ना कधि तरि नक्किच आला असेल. परन्तु हा असा अनुभव मला किति वेळा यावा? गेले १० वर्षे हा प्रकार मि सातत्यने अनुभवतोय.जवळपास ९०% वेळा मला हा अनुभव येतो. आपण चहा प्यायला एखाद्या अमृततुल्या मध्ये जावे,आणि लगिच वेटरने झाडु हातात घेउन अख्खे होटेल झाडत आपल्यापाशि येउन आपल्याला हुकुम सोडावा "साब पाव उपर करो"! मि प्रथम असल्या घटनान्कडॆ दुर्ल्क्श करायचो,परन्तु असा अनुभव जेन्व्हा मला सारखा येउ लागला तेन्व्हा मात्र मि हादरलो. बर हा अनुभव फ़क्त पुणे शहरातच नाहि तर समस्त भारतवर्षात येउ लागला होता. किम्बहुना अजुनहि येत्तोय. मुंम्बई,बेन्गलोर,दिल्लि,कोएम्बतूर अशि अगदि आसेतुहिमालय शहरे धरलित तरि अनुभव हा एकच. मग ते साधे अमृततुल्या असो कि एखादा चान्गले रेस्टोरन्ट असो,माझ्या अवतिभवति येउन साफ़सफ़ाई करायचि वेटर लोकाना भारि होस असते. एकतर मि अगदि गबाळा राहतो म्हणुन कि काय़ किन्वा ह्या जनतेला मि कोणितरि मॊठा साहेब आहे असे वाटत असावे, कि लगिच येउन साफ़सफ़ाई सुरु होते?हे आजपर्यन्त मला न उलगडलेले कोडे आहे...................... (अनुभव २) तेन्व्हा मि नोकरिला लागुन जेमतेम २ वर्षेच झालि असतिल,नोकरिनिमित्त आमचा मुक्काम कोएम्बटुर नामक तामिळदेशातिल एका शहरात पडला होता.मराठि/हीन्दि बेल्टच्या बाहेर राहण्य़ाचा माझा हा पहिलाच अनुभव...... आपण रस्त्याने चालताना आपल्याला "साब आपको हिन्दि/मराठि आति है क्या?" असा प्रश्न कानावर पडावा... मि चमकुन वळुन पाहिले तर एक पस्तिशितिल पुरुष,बरोबर त्याचि बायको,तिच्याकडेवर एक मूल,बरोबर एक विशितला तरुण,आणि एक म्हातारि असे एक कुटुम्ब माझ्यापुढे उभे.हि जनता मराठि आहे हे लगिच माझ्या लक्शात आले. "साहेब सगळे पैशे काकान्कडे होते,ते स्टॆशनवर पाणि प्य़ायला उतरले होते आणि तेव्हद्य़ात गाडी सूटलि, आमच्याकडे खायला पण पैशॆ नाहीत हो.काहितरि मदत करा." अशि विनन्ति करण्यात आलि.मि नाव गाव पुसले तर हि जनता मराठवाडयतिल बीड नामक जिल्ह्यातिल होति असे कळलॆ. आपल्या राज्याबाहेर कोणितरि मराठि माणुस भेटला कि काय आनन्द होतो म्हणुन सान्गु! मला एकदम भरुन आले. मि कसलाहि विचार न करता त्या कुटुम्बाला माझ्याकडचे २०००रु काढुन दिले. काय करणार?आम्हि पडालॊ सिह राशिचे..उदार...भाबडेच म्हणा हवे तर. मला तेन्व्हा अगदि कृतकृत्य वाटले होते. परन्तु हि असलि जनता नन्तर मला जागोजागी भेटु लागलि,हेदेरबाद,चेन्नै,बन्ग्लोर वगैरे....तेन्व्हा मात्र माझा भ्रमनिरास झाला. काहि लोकान्चा हा व्यवसाय असल्याचे माझ्या लक्शात आले.आपण मुर्ख बनलो होतो हे समजले.फ़ार चीडचिड झालि. हल्लि बेन्गलोर मध्ये हि असलि बरिच जनता फ़िरताना सापडते.पण मि मुळिच भिक घालत नाहि.................................... (अनुभव ३) इथे बेन्गलोर मध्ये चहा अनि सिगारेट हे बेकरि मध्ये मिळायचे पदार्थ आहेत अशि पद्धत किन्वा समजुत आहे. तर अशाच एका बेकरि समोर उभा राहुन माझे धुम्रपान व चहापान चालु होते.अशातच माझ्या बाजुच्या एका तरुण मुलाने माझ्याशि बळेच बोलायला सुरुवात केलि.तुम्हि कुठले,मि कुठला वगैरे त्याने सुरुवात केलि.मि पूण्य़ाचा आहे हे पाहुन बळेच माझ्यापुढे पुण्य़ा-मुम्बै चे कवतिक केले.घसटण......तो कूठल्या तरि बिपिओ मध्ये कामाला होता.मग माझा मोबाइल नम्बर मागुन घेतला वगैरे.. मि त्या माणसाला पार विसरुनच गेलो होतो.एक २ आठवडयानन्तर ह्या माणसाचा मला रात्रि फोन आला. जरा अघळ पघळ गप्पा मारल्या.मग हळुच ह्याने विषयाला हात घातला. अरे मि तुला फ़ोन अशा करिता केला होता कि actually मि आणी माझे ४ मित्र मिळुन एक business सुरु करतोय. शनिवारि सन्ध्याकाळि अशा अशा ठिकाणि आमचि पहिलि "Kickoff Meeting" आहे. प्रत्येकि ५००० रु घालतोय आणी हा BUSINESS फ़ार फ़ायद्याचा आहे वगैरे.त्याने बरिच फ़लन्दाजि केलि. मि त्याला विचारले कि बाबारे तुम्हि कसला Business सुरु करत आहात?जरा सविस्तर सान्गशिल का? तो-"अरे तु या मीटिन्गला येच,तिथे तुला सगळे सविस्तर सान्गतो.तु कसलिहि काळजी करु नकोस." मि-"मित्रा,जो पर्यन्त मला एकन्दरित काय प्रकार आहे हे कळत नाहि तो पर्यन्त मि असल्या कुठल्याहि मिटिन्ग्स्ला वगैरे येणार नाहि." तर हा so called मित्र माझ्यावर बराच नाराज झाला.तुला उद्या फ़ोन करुन सगळे सविस्तर सान्गतो म्हणुन ह्याने फ़ोन ठेवुन दिला. सकाळि एक ११ वाजता या माणसाचा मला परत फ़ोन. "अरे आम्हि जरा programe change केलाय.५००० रु ऐवजि आम्हि आता १०००० रु घालायचे ठरवले आहे. तु शनिवारच्या Meeting ला येणार आहेस ना,तेन्व्हा येताना चेकबूक घेउनच ये." मी तर जाम उडालोच.म्हन्टले च्याइला हा काय प्रकार आहे.हा माणुस मला confirmed धरुन कसा काय बोलतोय? मग त्याला जरा दमात घेउनच सान्गितले,कि "मित्रा मि तुला कालपासुन काय विचारतोय आणि तु त्याबद्दल एका शब्दाने पण बोलायाला तयार नाहिस आणि पैशे कसले मागतोस?मला तुमच्या ह्या असल्या कुठल्याहि BUSINESS मध्ये काहिहि interest नाहि.sorry" असे म्हणुन फ़ोन ठेवुन दिला.शनिवारि रात्रि ह्या माणसाने मला बरेच फ़ोन केले,पण मि एकालाहि response दिला नाहि. रविवारि सकाळि परत ह्याचा मला फ़ोन आला.मि पण हि कटकट ऎकदाचि सम्पवून टाकु म्हणुन फ़ोन उचलला. ह्याने लगिच सुरु केले कि अरे कालचि Meeting खुप छान झालि.तु मिस केलिस वगैरे. हि जनता AMWAY का JAPAN LIFE असला कुठला तरि व्यवसाय करण्याच्या बेतात होति. मला हया असल्या CHAIN MARKETING च्या प्रकारात अजिबात Interest नाहिये.उगाच आपण मुर्ख बनलो म्हणुन बाकिच्या लोकाना मुर्ख बनवायचे हे मला अजिबात पटत नाहि. मि त्याला तसे स्प्ष्टपणॆ सान्गुन टाकले आणि हा विषय तिथेच बन्द केला. नन्तर एक २-३ महिन्यान्नतर मि एका MALL समोर सिगारेट आणि चहा पित उभा होतो. तिथे पण हाच अनुभव.बाजुच्या एका बर्यापैकि दिसनार्या मुलाने माझ्याशि ओळख करुन घेतलि. तिच style.मग फ़ोन नम्बर मागुन घेतला.मला थोडेसे click झाले.गम्मत वाटलि. म्हन्टले बघुयात हा हिरो काय करतोय ते. मग परत १०-१२ दिवसानि ह्याने मला फ़ोन केला.सुरुवात तिच.इकडच्या तिकडच्या गप्पा. मग ह्याने अगदि professional english मध्ये सुरु केले. "Abhijit,I forgot to tell you something.actually I am very much impressed by your personality and your profile.I discussed this with my friends and they are also very much impressed with you and we have decided to offer you partnership in our business. actually all of us wanted to meet you sometime.can we meet this sunday at MG Road?" मार्केटिन्गवालि जनता जसे गोडगोड बोलते ना तसेच ह्याने सुरु केले. मि मागचा अनुभव आठवुन जरा सावध झालो.मग मिच त्याला सुनावले,कि जर का तुम्हि कुठला तरि AMWAY किन्वा JAPAN LIFE वगैरे business करत असाल तर मि आधिच असल्या २ कम्पनित पार्टनर आहे.तेन्व्हा sorry. माझा अन्दाज खरा ठरला होता.त्याने फ़ोन तिथेच कट केला. आता हि घटना होऊन पण २ महिने झाले असतिल.परत तसाच प्रकार! BANGALORE CENTRAL माल समोर पण अशाच एका नमुन्याने माझ्याशि बळेच ऒळ्ख काढलि. पुन्हा तोच प्रकार.गप्पा.वगैरे. अत्तापर्यन्तच्या अनुभवाने मि लगिच सावध झालो.मला दाट सन्शय आला कि हा प्राणि पण ह्याच पन्थामधला आहे.जसा त्याने माझ्याकडे फ़ोन नम्बर मगितला,तसा मि त्याला एक BALL टाकला. "तु हे 'AMWAY' वगैरे कधि पासुन करतोस?" माझा हा प्रश्ना ऐकुन तो उडालाच.त्याला तो ball योर्कर पडाला हॊता. तो-"तुम्हाला कसे कळ्ले कि मि AMWAY करतोय म्हणुन?" मि-"मित्रा मि पण गेले बरेच वर्षे AMWAY करतोय.ह्या सगळ्या STYLE मला माहिति आहेत." त्या बिचार्याचा चेहरा अगदि पहाण्यासारखा झाला होता.परत भेटु वगैरे करुन तो तिथुन पसार झाला. माझ्या ball वर हि wicket पडलेलि पाहुन मला काय आनन्द झाला म्हणुन सान्गु महाराजा. मग तोच अत्यानन्द मि एक फ़क्कड चहा (विथ सिगारेट) मारुन साजरा केला. पहिल्यान्दाच मि कोणाला तरि मुर्खात काढले होते.................................. तर असो.... मि तुम्हा सगळ्य़ाना बोर केले असेल तर जाहिर माफ़ि. माझा हा पहिलाच लेखन प्रपन्च.तेन्व्हा ज्या काहि चान्गल्या वाइट सुचना असतिल तर त्या जरुर कळवाव्यात,हि विनन्ति. (एक अनुभवग्रस्त) अबब

वाचन 9249 प्रतिक्रिया 0