मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निशाणी..! :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
माझ्या मायबाप मिपाकरांनो, राम राम! आपण सगळे राजकारणी नसून सामान्य कष्टकरी जनता आहोत हे किती छान आहे! पण समजा आपण एक अपक्ष राजकीय उमेदवार आहोत आणि निवडणुकीला उभे आहोत तर आपली निशाणी काय असेल बरे? :) त्या करताच हा धागा. इथे प्रत्येकाने आपापली आवडती निवडणूक निशाणी सांगायची आहे, जमल्यास तिचे चित्रही द्यायचे आहे. मिपाकरी जनता निवडणुकीला उभी असती तर तिची काय निशाणी असती हे समजून घ्यायची मला उत्सुकता आहे म्हणून हा धागा. तेवढीच जरा गम्माडीजंमत! :) हम्म, आता माझी निशाणी - चपला! :) Image removed. निवेदन - हा धागा केवळ मौजमजा म्हणून काढला आहे. स्वत:चा ऊर बडवून, १) हा धागा कुणा एका व्यक्तिला टारगेट करण्याकरता काढला आहे, २) हा धागा बिनडोक, निर्बुद्ध आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी आक्रोश करणार्‍यांना मी फाट्यावर मारतो. या मंडळींना या धाग्यात भाग घेऊन आपली निशाणी कळवण्याची कसलीही सक्ति नाही, त्यांनी 'एका भिकारचोट, निर्बुद्ध माणसाने काढलेला एक तितकाच निर्बुद्ध धागा!' असे स्वत:शीच बडबडून या धाग्याकडे अवश्य दुर्लक्ष करावे! :) निवेदन संपले. चला तर मंडळी, सचित्र कळवा आपापल्या निशाण्या..! :) आपला, (चपलाप्रेमी) तात्या.

वाचन 19335 प्रतिक्रिया 0