मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंजीर मोदक (पेढा)

दिपाली पाटिल · · पाककृती
Image removed. पेढा साहित्यः १ कप दुध पावडर २ टे. स्पु . तुप वेलची पावडर १/२ कप अंजीर पेस्ट (५ अंजीर १/२ कप दुधात भिजवुन बारिक करावेत) १/२ डबा कंडेन्स्ड दुध (याच्या गोडपणा मुळे साखर लागत नाही सहसा..) कृती: वरिल सगळं साहित्य (वेलची पावडर सोडुन) एका पॅन मध्ये एकत्र करुन घ्या. कमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. वेलची पुड टाकुन हलवा आणि हव्या त्या आकारात पेढे बनवा. वरुन बदाम काप टाकुन सजवू शकता... Image removed. टीपः अंजीर न टाकता पेढ्या चा बेस तयार होईल, त्यात दुसरा फ्लेवर टाकुन ही पेढे बनवता येतील. जसं केशर पेढा... Image removed.

वाचन 12068 प्रतिक्रिया 0