मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो. आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे.. 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे! :) क्लिंटनसारखी इतरही अनेक मंडळी राजकीय, सामजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, पाककला, कलादालन अश्या विविध विषयांवर आज मिपावर लिहित आहेत ज्याची इतर प्रसारमाध्यमेही आता दखल घेऊ लागलेली आहेत. मी या सर्व मिपाकरांचा व्यक्तिश: ऋणी आहे. या मंडळींमुळेच आजवर मिपा वाढले आहे, बहरले आहे आणि यापुढेही ते असेच बहरेल अशी आशा व्यक्त करतो.. क्लिंटनचे पुनश्च एकवार मनापासून अभिनंदन आणि अश्याच दर्जेदार लेखनाकरता यापुढेही शुभेच्छा! मिसळपावधर्म वाढवा, मिसळपावधर्म जगवा! आपला, (कृतार्थ, कृतज्ञ, आणि ऋणी!) तात्या अभ्यंकर, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.

वाचन 13147 प्रतिक्रिया 0