मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाळासाहेबांनापण कबूल..!

विकास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कसाबचे नवीन वकील अब्बास काझमी, यांनी या अतिरेक्याचे वकीलपत्र घेतले म्हणून त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठीत इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्तपदावरुन काढून टाकण्यात आले. या संदर्भात आज बाळासाहेबांनी सामनामधे "हा इस्लाम आम्हालाही कबूल आहे" म्हणून अग्रलेख लिहीला आहे. त्यातील मुद्दे:
  1. अंजली वाघमारे वकीलपत्र घेऊन स्वतःच आधी कोर्टात खोटे बोलल्या होत्या.
  2. महेश भट, शबाना आझमी, मेधा पाटकर, टिस्टा सेटलवाड हे नेहमीचे यशस्वी कलाकार चिडीचूप आहे. अतिरेकाविरुद्धची आग ही मेणबत्त्यांबरोबरच विझली आणि अतिरेक्याला मानवतावादी वागणूक मिळवण्यावरून पणत्या पेटल्या.
  3. या मार्गाने जर भारतातील मुस्लिम समाज आधीच गेला असता, तर आज भारताचे चित्र वेगळे झाले असते.
  4. कसाबच्या जागी एखादा हिंदू असता तरी आमची भुमिका बदलली नसती. उलट ती अधिकच प्रखर झाली असती.
  5. कसाबचे वकीलपत्र घेणे, हे सैतानाची वकीली करण्यासारखे आहे आणि हे इस्लामलाही अमान्य आहे म्हणून जिमखान्याच्या विश्वस्त मंडळावरुन अब्बास काझमींची हकालपट्टी करण्याचा इस्लाम जिमखान्याने घेतलेला निर्णय बरोबर आहे.
  6. अशा इस्लामला आम्ही राष्ट्रधर्म मानतो आणि त्याला मानाचा मुजरा करतो. मुसलमान या विचाराने वागले व जगले तर भांडण उरतेच कोठे?

वाचन 8807 प्रतिक्रिया 0