कॅलिफोर्निया स्पेशल!!
आपली स्वतःची ओळख करून देणार्या धाग्यामध्ये आम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्याचे म्हटल्यावर आम्हाला नंदन आणि बेसनलाडू यांचे उत्तर आले की ते सुद्धा तिथेच रहातात. तेंव्हा एक कल्पना सुचली की कॅलिफोर्नियात रहाणारे किती मि.पा मेंबर आहेत त्याचा अंदाज घ्यावा...
तर मि. पा. करांनो, जर तुम्ही सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्य करीत असाल तर कृपया प्रतिसाद द्या...
पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा. ची कॅलिफोर्निया शाखा सुरु करूयात....
ही मुंबई-पुण्याची मेंबरं, च्यायला, एकत्र येवून पार्ट्या झोडायच्या गोष्टी करून आपल्याला जळवतात, आपणही इथे पार्ट्या करू....
मिसळ-पाव तर ठेवूच पण कायतरी कोंबडं-बकरं ही मारू की...
शाकाहारी लोकांसाठी काहीतरी श्रीखंड-पुरी वगैरे...
ड्रिंक्स वगैरे सुद्धा (आमच्या बायकोची फुल परमिशन हाय वो!)...
मुख्य म्हणजे एकत्र येऊन गप्पा-टप्पा करूयात की....
काय, पटते का आयडिया?
तुमचा,
डांबिसकाका.
वाचन
16822
प्रतिक्रिया
0