मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

विसोबा खेचर · · जे न देखे रवी...
प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती.. आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा. त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल. अजून चैत्र संपायचा आहे तोवर मिपावर चैत्रगौरींचं ह़ळदीकुंकू धुमधडाक्यात साजरे करीन म्हणतो! अर्थात, वर उल्लेख केलेल्या भगिनींनी सहकार्य केलं तरच! आणि त्या करतील अशी खात्रीवजा अपेक्षा आहे! तात्याचा शब्द खाली पडू द्यायचा किंवा नाही हे त्यांनी ठरवायच :) आपला, (संस्कृतीप्रेमी) तात्या. -- साला, संस्थळ कसं चालवायचं ते तात्याला विचारा! :)

वाचन 10125 प्रतिक्रिया 0