मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक. वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले. विशेष दिवशीच अशी मिठाई भृगू दरबारात स्वीकारली जाते, हे मला तेंव्हा कळले. कोऱ्या कागदावरचे वाचन चालू झाले. आणि आश्चर्य म्हणजे मला महर्षी म्हणाले, तू जमलेल्या भक्तांना गणेश देवता रूपाने आशीर्वाद दे. मला सर्वस्वी नवीन धक्कादायक अनुभव होता. या रीडींगच्या वेळी मी जालंधर शहरात त्यांना भेटायला गेलो होतो. पंजाबी पद्धतीने अघळपघळ स्वागत झाले. त्यांनी वाचनाचे शूटिंग करायला आनंदाने परवानगी दिली. कॅमेरा, एंगल, लाइटिंग वगैरे जुळवणी करताना पंडितजी कौतुकाने पहात होते. मीच त्यांना जरा लांब ठेवलेले कोरे कागद ते गादीवर बसल्यावर हातात दिले. तासाभरापेक्षा जास्त चाललेल्या वाचनात ते वेळोवेळी भावविवश होऊन, आनंदी होऊन डोळे पुसत असे वाचत होते की जणू लिहिलेले वाचताना जसे पान उलटायला लागते तसे ते उलटत असत. फोन आला तर ते घेत त्यात ते पंजाबीत बोलत असत. सर्वात शेवटी भृगुऋषींनी आदेश केल्याप्रमाणे तिथे ठेवलेल्या दीपावर ते कोरे कागदाला जाळून टाकले गेले! (आधीच्या एका धाग्यावर श्री रमेश नाईक यांनी भृगुसंहितेच्या वाचनाचे प्रात्यक्षिक आहे का? असेल तर वाटायला आवडेल म्हणून म्हटले होते. त्या संदर्भात हा धागा सादर करत आहे.)

वाचन 4052 प्रतिक्रिया 0