दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन
लेखनप्रकार
नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले.
हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे. निसर्गाने या तालूक्याला भरभरून दान दिले आहे. या तालुक्यात सागाची भरपूर वने आहेत. पावसाळ्यात येथे जातांना चरणमाळ आणि कोंडाईबारी या घाटांमध्ये असलेल्या जंगलातले द्रुष्य तर मनोरम असते.
येथील आदिवासी रहीवासी कष्टाळू आहे. शासनाच्या क्रुपेमुळे (!!) त्यांची आर्थीक परीस्थीती चांगली आहे.
या ठिकाणी लाकूड कताई / लाकूड काम फार मोठ्या प्रमाणात चालते. सुतार लोक प्रामाणीक आहेत. गिर्हाईकाकडुन योग्य मोबदला घेवुन सागवानी ला़कडाचे सामान बनवून दिले जाते.
या गावाच्या परीसरात बर्ड फ्लू च्या साथीने कोंबड्या मरण्यापुर्वी (२००६) कोंबड्याची शेते (पोल्र्ट्री फार्म) फार मोठ्याप्रमाणात होती. इतकी की, गाव ५-६ कि.मी. वर असतांना कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. आता ते प्रमाण फारच कमी झाले आहे.
या गावाची भौगोलीक रचना काहीतरी वेगळी असल्याने येथील हवा कोरडी असुनसूद्धा फार गरम होते. थंड वारे सहसा वाहतच नाही. बारोमास तुम्ही पंख्याशीवाय राहूच शकत नाही. (१ कि.मी. च्या फरकाने हेच गाव गुजराथ मध्ये असले असते. गुजरात मध्ये भारनियमन नाही. )सुरत, बारडोली, बडोदा सारखे मोठे शहरे जवळ असूनही येथील MIDC नावालाच आहे. ("गुजरात मधील सुब्बत्ता बघुन ..." ह्या वाक्याचा संदर्भ आत्ता तुमच्या लक्षात आला असेल.) असो. कालाय तस्मै नमः
आता या लेखाच्या मुख्य शीर्षकाबद्दल्...
नवापुर रेल्वे स्टेशन हे पश्चिम रेल्वे च्या सुरत-जळगाव या मार्गात येते. येथे जो रेल्वे फलाट आहे तो अक्षरशा: निम्मा महाराष्ट्रात आणि निम्मा गुजरात राज्यात येतो.
जसा:
===========गुजरात हद्द [ नवापुर रेल्वे फलाट ] महाराष्ट्र हद्द============
छायाचित्र क्रमांक १. विकीमॅपीयावरील नवापुर रेल्वे स्टेशनचे छायाचित्र
छायाचित्रात जी लाल रेषा आहे त्या ठिकाणी दोन्ही राज्याची हद्द सुरु होते (किंवा संपते). (मी जसे काही वाघा बॉर्डर वर उभा आहे असे सांगतो आहे. :-))
छायाचित्र क्रमांक २. आस्मादिकांचे चिरंजीव महाराष्ट्रात तर भाचेराव फुटभर लांब असलेल्या गुजरातेत उभे!
ह्या फलाटावर तिकीट देणारा कारकून हा महाराष्ट्रात बसतो (छायाचित्रात पत्रे टाकलेली जागा जरा बारकाईने बघा); आणि तिकीट घेणारा पासिंजर हा गुजरातेत उभा असतो (आग विझवणार्या बादल्या / सिमेंटची जाळी या मागे). पासिंजरचा खांदा गुजरातेत आणि पैसे घेतलेला हाताचा पंजा महाराष्ट्रात असतो.
छायाचित्र क्रमांक ३. नवापुर रेल्वे स्टेशनची पाटी
छायाचित्र क्रमांक ४. डोकारे (नवापुर) येथील सहकारी साखर कारखाना
आम्ही गेलो तेव्हा उसासाठी मारामार चालु होती. त्यामुळे कारखाना बघण्यासाठी थोडे थांबावे लागले. नंतर कारखान्याच्या कार्यस्थळापासुन जवळच असलेल्या गावी एका लाकुड काम करणार्या सुताराच्या वर्कशॉप ला भेट दिली.
वाचन
11238
प्रतिक्रिया
0