मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2 मी कोण आहे..आदीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या वैदीक ऋषि नी केला.. योगविज्ञान.मेडिटेशन..चक्र ऎक्टिवेट केली अन त्याना तो अनाघत ओम्काराचा नाद ऐकु आला..तो अलोक दिसला.. व हे ब्रह्मांड म्हणजे अणु अन उर्जे पासुन निर्माण झाले असा सिद्धांत मांडला गेला म्हणजेच पिता शीव व माता पार्वति म्हणजेच उर्जा असे तीला नाव दिले गेले.. ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीत चराचरात व त्याच्या निर्मीतित शिव पार्वती तत्व आहे असा सिद्धांत मांडला गेला.. मात्र पाश्च्याताना हा सिद्धांत माहित नव्हता त्यानी ब्रह्मांडाची विभागणी २ ढोबळ स्वरुपात केली.. १ म्य़ाटर..म्हणजे पदार्थ २ एन्रजी म्हणजे उर्जा.. म्याटर/पदार्थ म्हणजे..गाड्या..विमाने मोटारी..ईमारती. एनर्जी/उर्जा म्हणजे माणसे पशु पक्षी.. जगदीशचंद्र बसुनी वनस्पति श्वास घेतात हा सिद्धांत सिद्ध केल्यावर त्यात फुले वनस्पति आदी समाविष्ट झाले... आइनस्टाइन यांनी E=mc2, हा सिद्धांत मांडला व जगास वैदिक सिद्धांत मान्य झाला.. ब्रह्मांडात सजिव निर्जिव असे काहि नसुन सारे अणु उर्जेचेच रुपे आहेत.. प्रत्येक अणुचे गुणधर्म ठरलेले असल्याने..आंब्याच्या झाडास नारळ येत नाहि..वा गायी ला वाघाचे पिल्लु होत नाहि..कारण अणुचे गुणधर्म बदलण्याची ताकद त्या योनी मध्ये नाही मात्र मानव ही अशी एकच योनी आहे ज्याला अणु उर्जेचे गुणधर्म बदलता येतात त्याच्या जवळ ती शक्ति हत्यर आहे ज्याचे नाव "विचार" त्या मुळे "सकारत्मक " विचाराना आपल्या कडे महत्व आहे.. साधक तुकोबा हे अतिशय दक्ष होते - मनाला मुठीत ठेवण्यासाठी, विचारांकडे साक्षित्वाने बघण्यात, ... तुकोबांनी मन पांडुरंगालाच वाहिले आहे अणु मधे उर्जा कोठुन येते..हा मानवाला प्रष्ण पडला क्वांट्म फिजिक्स चा जन्म झाला व अणु मध्ये जे photon electron neutron जे फिरत असतात त्या पासुन उर्जा मिळते असा सिद्धात मांडला गेला.. व पुढे "स्टिंग थिअरी" चा सिद्धांत पण मांडला गेला. कित्येक हजार वर्षी पुर्वी आपल्या ऋषी मुनीनी हाच सिद्धांत मांडला होता.. अणुच्या गर्भात फीरणारे photon electron neutron ला त्यांनी ब्रह्मा विष्णु महेश अशी नावे दिली होती व त्यांच्या वैश्वीक उर्जेस त्यांच्या पत्नी मानुन सरस्वती..लक्ष्मी..पार्वती अशी नावे दिली गेली.व त्या वैश्वीक उर्जेचे आपण आजही पुजन करत आहोत.. तसेच त्यांनी "उत्पत्ती.स्थिति व लय" हा जगन्मान्य मांडला एखादी गोष्ट निर्माण होते..काहि वेळ ती रहाते व नंतर अनंतात विलिन होते असे त्या सिद्धांताचे स्वरुप आहे.. निर्मीति करण्यास बुद्धिमत्तेची गरज असल्याने आपण सरस्वतिस ज्ञानाची देवता मानतो.... चलन वलन करण्या साठी धन धान्य समृद्धी ची गरज असल्याने माता लक्ष्मी स समृद्धीची देवता मानण्यात आले.. उत्पत्ति नंतर स्थिति मधे ज्या अमंगल शक्ति संतुलन बिघडवण्यास येतात त्यांचा विनाश करण्या साठी माता पार्वतिस काली चा दर्जा दिला गेला.. शिव व उमेचे नामस्मरण करत भगवान श्री कृणाने शिकवलेल्या कर्म योगा प्रमाणे कर्म करत रहाणे व आनंदी समृद्ध जीवन जगणे ही जीवनाची इतीकर्तव्यता आहे.. पिता शंभो व माता उमेस प्रंणाम व चरणी लीन

वाचन 11171 प्रतिक्रिया 0