'तेरी केहॆके लुंगा' भाग 2
लेखनप्रकार
ऍडमिट झाल्यावर रेक्टरनी घरी कळवले. काळजी घ्यायला मित्र होते. आई रेक्टर ला फोन करून बोलली की मी 6-7 दिवसांनी येते. तो पर्यंत त्याच्या मावस भावांना पाठवते. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. जास्त कोणाला सांगू नका ही ताकीद मी दिलेलीच. पाहिले काम त्यांनी केले न्हावी आणि फेस मसाज वाल्याला बोलावले. जरा बरा दिसायला लागलो मी. डोक्यात राग बराच होता
इकडे हिचा भाऊ आणि त्याचे 4 मित्र लपून बसलेले .
काही खबर नव्हती. हेयर लाईन क्रॅक आणि जखमा भरून निघाल्यावर आठवड्या नंतर डिस्चार्ज मिळाला. इकडे वेगळेच नाटक रंगले होते.
ज्युनियर आणि सिनियर चे. या अनविता कुमारी भाग जा.अनविता कुमारी रंडी हे( भाषेबद्दल क्षमस्व) ह्या रोज घोषणा हॉस्टेल समोर होत होत्या .
पोलीस आलेले मला 3 वेळा शोधायला . रेक्टर शी बोलणे झाले म्हणाले येऊ नको 15 दिवस तरी. लॉज बुक केला. भावाला म्हटले तू जा आता पण मला लाखभर रुपये आता देऊन जा. आई आल्यावर भांडायचे नाहीये मला. माझा चिडचिडेपणा पाहून चेक देऊन गेला बिचारा. अभ्यास कर हा सांगून.
हमको दिवना कर गये नामक अक्षय कुमार चा चित्रपट आलेला. रोज 4 शो पहायचे . तिकडेच बॉटल मध्ये दारू मिक्स. झोपायचे आणि. हे सगळे पोलीस पकडू नये म्हणून. 1 ला रात्री लॉज ला जायचे आणि झोपायचे परत 9 ला मुव्ही...
त्रास होत होता पण काय करू सुचत नव्हते. 8 दिवसांनी रेक्टर चा फोन आला वरूण हॉस्टेल ऑफिस ला ये. गेलो मी .म्हणाले वरुण बाहेरून खूप चक्र फिरत आहेत. मला फोन आले वरुण मोहिते आया तो तुरंत बताना. जपून राहा.
परत लॉज ला मी.
त्यानंतर अचानक 2 दिवसांनी सोमाणी चा बॉयफ्रेंड आला वास्तविक तो काय माझा मित्र वैग्रे नव्हता ना आय आय टी ला शिकत होता. बोलला चल म्हटलं कुठे? आणि माझा पाय दुखतोय. गाडीने जाऊ गाडीने परत सोडतो तुला म्हणाला .
आगरपडा, मीदनापूर ला वैगरे घेऊन गेला. देशी कट्टे यायचे तिकडे. दाखवत नसलो तरी घाबरलेलो मी. गोरखपूर चे कट्टे , पश्चिम बंगाल ला घरचे कोण नाही . सेमिस्टर तोंडावर.
हा म्हणाला पैसा रख . सोच मत कुछ हुवा तो मेरा बाप देख लेगा. रूम वर आलो लॉज च्या तितक्यात नीरज म्हणून एक लोकल गुंड आला. मारते साले को . सोमाणी बोला मुझे . चूप क्यो बैठा तू असं काय काय बोलायला लागला.
आता ह्या नीरज आणि योगेश बाहुबली ह्या हत्तीच्या लढाईत मी पिचणार मला कळून चुकले होते.
मी काही बोललो नाही फक्त रात्रंदिवस अभ्यास चालू केला . कोणी विषय काढला तर जाणे दे रे इतकंच बोलायचो.
कॉलेज ला माफीपत्र पाठवले . मंजूर झाले. आई पण येणार होती पण ती गेल्यावर परत सेम नंतर बदला कसा घ्यायचा हा प्लॅन डोक्यात पूर्ण तयार होता. थंडगार वाटते कमरेला गन असली की !!!
आता जपून पावलं टाकायची होती. तितक्यात मी हॉस्टेल ला आलोय समजताच अनविता चा फोन आला . वरुण माँ को मिलने आऊ मै? सॉरी यार. आय लव्ह यु रे....
क्रमशः
वाचन
25665
प्रतिक्रिया
0