मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देवाघरची फुले

मराठमोळा · · काथ्याकूट
लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हंटले जाते आणी ते खरे आहे. निरागस लहान बालके घरात असतात तेव्हा जग विसरुन त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. जेव्हा ती आपल्या बोबड्या वाणीने कुतुहल भरलेले प्रश्न विचारतात तेव्हा किती सुंदर वाटतात आणी त्यांच्याशी त्याच वाणीत बोलायला किती छान वाटतं, सगळी दु:ख कशी दुर पळुन जातात. झोपेत जेव्हा खुद्कन हसतात तेव्हा अगदी गोड वाटतात, म्हणे सटवाई आणी जोखाई त्याना हसवितात असे ऐकले आहे. आईवडिलाचे तर उगाचच डोळे भरुन येतात कधी कधी आपल्या पिलांना पाहुन. एक वेगळेच विश्व एक वेगळीच किमया त्या परमेश्वराची. आजकाल परिस्थिती थोडी विचित्र दिसते आहे. आजकालची लहान मुले अवेळीच मोठी होऊ लागली आहेत आणी निरागस्पणा कुठेतरी थोडासा हरवल्यासारखा वाटतो आहे (सर्व लहान मुलांच्या बाबतीत नाही. उगाच आरडाओरडा नको.) आणी लहान मुलांमधे बंडखोरीची आणी हिंसक भावना बळावल्यासारखी वाटते आहे. आजकालची काही लहान मुले ईतकी हट्टी बनली आहेत की मार देऊन सुद्धा हट्ट सोडत नाहीत. काही मुले ईतकी हिंसक असतात की मनासारखे झाले नाही तर हातात असेल ती वस्तु फेकुन मारायला कमी करत नाहीत, यात बर्‍याच आजी आजोबांचे डोळे जखमी झाले आहेत. आता मी काही माझे अनुभव सांगतो. *आमच्या घरी काही पाहुणे आले, त्यांच्याबरोबर एक लहान मुलगाही होता. आल्याबरोबर त्याने घरभर धुमाकुळ घालायला सुरुवात केली, वस्तु पाडल्या, एक फ्लॉवरपॉटसुद्धा फोडला. त्याचे आईवडिल काहीतरी करतील अशी अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. "अहो तो ना ऐकतच नाही" अशी प्रतिक्रिया आली. ते दोन तास असह्य होते. *दवाखान्यात एक लहान मुलगा आणी त्याची आजी बसले होते. तो लहान मुलगा रडत होता बिस्किट हवे होते म्हणुन आणी दवाखान्यात बिस्किट कुठुन आणणार असे म्हणुन त्याची आजी त्याला समजावत होती. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलीने तिचे कानातले काढुन त्याला खेळण्यासाठी म्हणुन पुढे केले तर त्या (८ वर्षाच्या) मुलाने "मी काय बायल्या आहे का?" असे विचारुन त्या मुलीची बोबडी वळविली. *ओळखीतल्या एका कुटुंबात के ५वी ६वी तली मुलगी असेल. ती तिच्या मैत्रिणिंना घरी बोलवते आणी तिच्या आईला अक्षर:श मोलकरीण म्हणुन सांगते आणी वागवते. आमच्याकडे खुप पैसा आहे. आम्ही सुट्ट्यांमधे फॉरेन ला पिकनिकला जातो असे सांगते. खुप खोटे बोलते, महागड्या वस्तु खरेदी करण्यास भाग पाडते. आईवडील रागावले तर "मला मारुन टाका असे म्हणते" एक ना अनेक विचित्र गोष्टी. असे अनेक आणी सर्व खरे अनुभव आहेत, कितीतरी मुले आईला साडी वापरु नको असे सांगतात. पॅरेंट मीटींग साठी कार मधेच या नाहीतर येऊ नका असे म्हणतात. घरातुन पैसे चोरतात. काय म्हणावे या सर्वाला. ह्यामधली बरिचशी मुले एकतर मार देऊन किवा सायकियाट्रिस्ट चा सल्ला घेऊन बर्‍यापैकी ताळ्यावर आणता येतात पण ही मुले आईवडिलाच्या नाकी नऊ आणतात हे खरे, पण आता महत्त्वाचा मुद्दा असा की ह्या सर्वांचे कारण काय? खर जबाबदार कोण? पालक, समाज की काळ? आणी हे सर्व कसे कमी करता येईल? गर्भसंस्कार, एकत्र कुटुंबपद्धती आणी यासारख्या अजुन काही गोष्टी मिळुन या बाळगोपाळाना योग्य दिशा दाखवु शकतील का? आपला, मराठमोळा.

वाचन 15470 प्रतिक्रिया 0