मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(गज़ल)

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेरणा माणूस१ यांची सुरेख गज़ल मंदसा अन, निर्विकारी , बाज होता पण तरी ही जाहला आवाज होता पादला तो शांतपणे बघ दोन वेळा काय हा खाऊन आला आज होता? पाडले मीही प्रयत्ने काव्य थोडे पण विडंबन हाच माझा बाज़ होता आग शब्दांतील कसली डोंबलाची खानदानी आमचा तो माज होता तोंडदेखी वाहवा केली न माझी येव्हढा का तो कवी नाराज होता? लाथ थप्पड ह्या अशा आभूषणांनी सजवला नेहमीच अमुचा साज होता मी कशाला रोज त्या जातोय वाटे ? हेच उत्तर, "माल गर्रेबाज होता" !

वाचन 5694 प्रतिक्रिया 0