ललित/वैचारिक लेख

ट्रायोपॉनिक्स : स्वयंपूर्ण अन्ननिर्मितीची गुरुकिल्ली

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

हायड्रोपॉनिक्स + ॲक्वापॉनिक्स + बायोपॉनिक्स = ट्रायोपॉनिक्स

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. अन्नपाण्यावाचून जीवन नाही आणि निर्जिवांना वस्त्र आणि निवारा यांची गरज नसल्याने मानवाच्या उत्पत्तीपासून त्यांत अन्नाचा क्रमांक सर्वात पहिलाच राहिला आहे.

डियर ममा..

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

डियर ममा..

डियर ममा,

आज बर्‍याच दिवसांनी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जरासं खुट्ट वाजलं की फोन करणार्‍या आपल्या लेकीकडून चक्क पत्र आलंय, हे पाहून तुझ्या वर जाणार्‍या भुवया आताच मला दिसल्या आणि त्यांच्या खालच्या डोळ्यांत एक काळजीची लहरसुद्धा तरळताना दिसली मला! आहेच मुळी माझी मम्मी अशी... कशी? ते नाही नक्की सांगता येणार, पण नक्कीच 'वर्ल्ड्स बेस्ट'! ही ही ही!

कर्ण आणि कृष्ण

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

कर्ण आणि कृष्ण

कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे?
कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे?
जे आपले असते तेच द्यावे
की द्यावे तेही आपले रहावे?

रक्तगर्भी वारसा जखमेचा
सांभाळून ठेवावा उरात की,
स्वतःच्या आशेचेच कवच
स्वतःच्या जिवाला शिवावे?

परशुरामाचे शाप आळवत
खेचावी प्रत्यंच्या रागावून,
की कमलकरांनी जग जिंकून
पुन्हा कुणाचे रथ हाकावे?

हलेल तर शप्पथ..

सविता००१'s picture
सविता००१ in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

हलेल तर शप्पथ..

डिस्क्लेमर - कृपया हलके घ्यावं. हे लेखन पूर्णपणे काल्पनिक आहे.

काय गं बाई करायचं आता या वजनाच्या काट्याचं? जर्रा म्हणून हलत नाहीये जागचा. बिघडलाय की काय कोण जाणे. फेकूनच देणारे आता मी तो. काय म्हणालात? वजनाचा काटा नाही गं ... तू हल म्हणून? कळतात बरं का टोमणे. काय काय केलं मी विच्चारू नका.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ...

Jayant Naik's picture
Jayant Naik in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ...

पुरुष जरा मूर्खच असतात की काय कोण जाणे? पण आव काय आणतात, जणू काही साऱ्या जगाचे ज्ञान यांनाच आहे! आणि स्वतःबद्दल किती फाजील आत्मविश्वास? जरा दोन-तीन मुलींनी यांच्याकडे एकदादोनदा हसून पाहिले की हे एकदम आकाशात! अविनाशने मला प्रपोज करावे? मला.. आसावरी देशमुखला?

गोरमिंट

आदूबाळ's picture
आदूबाळ in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

गोरमिंट

काही महिन्यांपूर्वी एका वृद्ध पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ लोकप्रिय झाला होता. "ये बिक गयी है गोरमिंट, अब गोरमिंट में कुछ नहीं है" अशी सुरुवात करून ती महिला 'गोरमिंट'वर यथेच्छ तोंडसुख घेते. जिज्ञासूंनी तो व्हिडिओ आपल्या जबाबदारीवर पाहावा.

सतीश पिंपळे - एक ऋषिरंग

Naval's picture
Naval in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

३१ डिसेंबरचा दिवस होता. आम्ही सगळे न्यू इयर सेलिब्रेशनच्या तयारीत होतो. खाण्याचा एखादा मस्त बेत आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसणं असा नेहमीचा प्लॅन. आज आमच्याकडे एक चित्रकार येणार होते. आजवर मी आमच्या घरी खूप लेखक, कवी मंडळी आलेली पाहिली होती, पण  एका चित्रकाराला पहिल्यांदाच पाहणार होते. मला चित्रं काढण्याचं फार वेड, त्यामुळे मी फार खूश होते. वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.मध्ये पाहून चित्रकारांविषयी काही कल्पना तयार झालेल्या होत्या - लांब केस, दाढी, झब्बा असं काहीतरी...