Skip to main content

कळावे, लोभ असावा...

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 29/09/2019 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई. जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे.

शोलिंग-नल्लूरची प्रत्यङ्गिरा (प्रत्यंगिरा) देवी

लेखक चौथा कोनाडा यांनी रविवार, 29/09/2019 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी इ-मेल्स पहात असताना अचानक ऑफिस ऑर्डर दृष्टीस पडली ! “येत्या सोमवार पासून चेन्नै ऑफिसला रिपोर्ट करावे लागेल! ” चला, इथला मुक्काम संपला, मी मनाशी म्हटले. मी त्यावेळी कंपनीच्या बेंगळूरू ऑफिस होतो. अधून मधून तिथं आमच्या हैदराबादच्या प्रोजेक्ट हेडची रि-व्यूह व्हिजिट व्ह्यायची. एका मिटिंग मध्ये त्यांनी टीम कल्पना दिली की आपला हा प्रोजेक्टचा काही भाग चेन्नईच्या ऑफिसला शिफ्ट करावा लागणार आहे, पण ती वेळ एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते! इथं फक्त माझीच बदली झाली होती ! चेन्नई ऑफिसचा पत्ता होता: एलकॉट सेझ आय टी पार्क, शोलिंग-नल्लूर, चेन्नई.

डुब्रॉवनिक ....!!!!!

लेखक स्मिता दत्ता यांनी रविवार, 29/09/2019 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेहमी प्रमाणे लवकरच पहाटे जाग आली, पाच वाजलेले. ऊठून आवरायचं होतंच.नाश्ता पण करून बरोबर घ्यायचा होता. कारण बोटीवरती काय खायला मिळते माहित नाही, त्यामुळे मग फ्रेंच टोस्ट करून घेतले. सोबत नेहमीप्रमाणे छत्री, पाणी असा जामानिमा होताच. सकाळी साडेसहाची टॅक्सी बोलावली. लवकरच पोर्टवर पोहोचायचं ठरवलेलं इकडे तिकडे थोडं फिरता येईल म्हणून. तिथे बोट लागलेली होती पण दरवाजे बंद होते. दोन-चार लोक बॅगा घेऊन उभे होते. आम्ही तिकडेच थोडं फिरत बसलो. एका वेगळ्या अँगलनं सगळं स्प्लिट असं समोर दिसत होतं.

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.