Skip to main content

कुंडलीने घात केला

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 08/08/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलीने घात केला कसा कुंडलीने असा घात केला दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की शिखर गाठतो मी अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा पाय मागे कुणी खेचलेला खुली एकही का, इथे वाट नाही हरेक पथ येथे कुणी हडपलेला? पटू संसदेचा, तरी दांडगाई म्हणू का नये रे तुला रानहेला? दिशा दर्शवेना, मती वाढवेना कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला? "अभय" चेव यावा अता झोपल्यांना असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला गंगाधर मुटे ................................................... (वृत्त-भुजंगप्रयात)

विकांताची खादाडी : काळ्या मसाल्याची वांगी !!!

लेखक सुहास.. यांनी रविवार, 08/08/2010 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर सदर प्रांत आमचा नाही , गणपा, दिपाली,जागु,केशवसुमार आणी ढब्बो...आपल हे..प्रभो..ह्यांचा ;) पण सहज कोणीतरी आठवण काढली आणी घुसलो आम्ही स्वंयपाक घरात..तिथे शिरल्यावर जाणीव झाली आम्ही ही काहीतरी बनवितो की..चला तर मग करूया सुरवात .. साहित्य : दोन पेग ..आपल हे ...दोन कांदे..:( (गटारी फिव्हर) टीप : कांदे जरा 'तेज'घ्या !!

अजुन एक "स्वयंपाक आणि तु-तु-मी-मी"

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी रविवार, 08/08/2010 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी बाहेर गेलो होतो. नेहमीचे घरी लागणारे सामान आणायचे होते. आम्ही दोघं नवरा बायको आणि माझी एक मित्र मैत्रिण जोडपं असे मिळुन गेलो होतो. बाहेर पडायला जवळ जवळ ७ वाजले होते. लीस्ट प्रमाणे एकेक वस्तु ट्रॉली मध्ये टाकत टाकत सगळी खरेदी निवांत चालु होती. तेवढ्यात नवर्‍याचा फोन वाजला .आणि असे कळले कि कि त्याला एक अर्जंट कॉन्फरन्स कॉल जॉईन करावा लागणार आहे. तो म्हणाला कि मी घरी जातो आणि काम करतो..तुमच झालं कि तुम्ही या. त्याप्रमाणे तो घरी गेला.

स्वीकारता का आव्हान ?

लेखक गांधीवादी यांनी रविवार, 08/08/2010 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची चर्चा गेली अनेक वर्षे मी ऐकत आहे. चला तर मग एक खेळ खेळू मी वाईट बाबी नमूद करतो (मी वाईट तर वाईट सही), तुम्ही चांगल्या बाबी नमूद करा. काही अटी, १) कोणीही, कोणावरही वैयक्तिक चिखल फेक करायची नाही २) भारत देश हा एक सर्व साधारण माणसाच्या डोळ्याने बघून बाबी नमूद करायच्या. जसे कि ज्याला एक - दोन मुलं आहेत, रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे. तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे. ३) स्वताच्या आणि इतर मित्रांच्या समस्या देखील मांडू शकता. तर आहे का कबूल ? (जेव्हा कधी पुढे भारतात काय चांगले, काय वाईट हा प्रश्न विचारला जाईल, तेव्ह

विश्व चॅम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंतचे अभिनंदन

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी रविवार, 08/08/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
विश्व चॅम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंतचे अभिनंदन !!!!@@@!!!! जर्मनीतील म्युनिक येथे सुरु असलेल्या विश्व चॅम्पियनशीप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल प्रकारात ५९७ गुण मिळवले. सुवर्णपदक पटकावित जागतिक विक्रम नोंदविला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

लेखक खालिद यांनी रविवार, 08/08/2010 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.