मिसळपाव व्यवस्थापन
नमस्कार,
मिसळपाववर नवीन काही सोय देताना किंवा काही बदल करतांना किंवा केल्या नंतर सर्व सदस्यांचे मत घेतले जाते. त्यावर एक धागा व्यवस्थापनाकडून काढला जातो त्यात्या विषयावर सदस्यांची जी मते आहेत ती मागवली जातात. सदस्यांनी आपले मत तेथे देणे अपेक्षीत असते. तसेच मिसळपाववर व्यवस्थापनाचा असा प्रयत्न आहे की ज्या सदस्यांना शक्य आहे त्यांना मिसळपावच्या कामात सहभागी करून घ्यावे. या सर्वांचा हेतू हाच की मिसळपाव हे प्रत्येकाला अधिकाधिक आपले वाटावे. आणि ते तसे आहे सुध्दा.
मात्र एवढ्यात असे लक्षात आले आहे की काही धागे आणि काही निवडक प्रतिसाद हे मिसळपाव कसे असावे आणि कसे नसावे आदींवर केंद्रित आहेत.
मिसळपाव