Skip to main content

नागपंचमीच्या निमित्ताने

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 13/08/2010 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
नागपंचमी:- प्रतीवर्षी श्रावण शुक्ल ५ ला ही पूजा करायची पध्द्त आहे. नागाची मातीची मूर्ति किंवा घरातील देवपूजेच्या खोलीतील बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकॄती काढून ही पुजा करतात. त्याचप्रमाणे एखाद्या पाटावर पाच किंवा नऊ फ़ण्यांच्या नागांची आकॄती काढून पुजा करण्याचीही पुष्कळ घराण्यात पद्धत आहे. नवनाग देवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे.

शेअरबाजारात गुंतवणूक कशी करावी?

लेखक क्रेमर यांनी शुक्रवार, 13/08/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील सदस्य अनेक नीरनिराळ्या क्षेत्रात काम करतात. तसेच बहूसंख्य मिपाकर मध्यमवर्गीय असावेत असे वाटते. भावी आयुष्यासाठी बचत करणे, पैसा जोडणे या आजच्या जीवनात आवश्यक गोष्टी आहेत याविषयी दुमत नसावे. केलेली बचत कुठे गुंतवावी याविषयी विपुल साहीत्य उपलब्ध असले तरी त्यातून उपयुक्त माहिती बाजूला काढणे कठीण होऊन बसते. अनेक गुंतवणूकीच्या पर्यायांपैकी शेअरबाजारात पैसे गुंतवणे हा एक पर्याय आहे. मात्र शेअरबाजारात पैसे कसे गुंतवावेत हा एक मोठाच प्रश्न आहे. याबाबत मिपा सदस्यांकडून स्वानुभवावरून मार्गदर्शन मिळवावे हा या चर्चेचा उद्देश आहे.

धपाटे- खास कोल्हापुरी!

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 13/08/2010 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. अंह! अंह!! अपर्णाची गल्ली चुकली कि काय ? अस नका वाटून घेऊ ! आम्ही इथे अगदी बरोबर पत्त्यावर आलो आहोत. तर पाहिलं नमन त्या गणपाला!! द्या आशीर्वाद हो मजला! पाक कृतीचा वसा चालवण्याला! माझा दुसरा साष्टांग जागुताई! घे लेकरास जाणून बाई ! तिसरा नमस्कार केशवजी तुम्हा! द्या आशीर्वाद आज आम्हा! चला सुरुवात करू. श्रावण म्हंटल कि जशी हिरवागार साज ल्यालेली धरित्री दिसते, तशीच मला जाणवते आपली सुध्धा त्या रुपात सामावून जाण्याची, त्या जल्लोषात सामील होण्याची अनावर आस! म्हणूनच कि काय श्रावणात बक्कळ सण असतात. आज चतुर्थी! भावाचा उपास!

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक "शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात. सगळ्यात सुप्रसिद्ध सदसद्विवेकी शिट्टीवादक होते 'डीप थ्रोट' या नावाने प्रसिद्ध असलेले आणि त्यावेळी FBI चे सहनिर्देशक असलेले विल्यम मार्क फेल्ट (Sr) हे गृहस्थ.

गणेशा वंदन तुजला आता

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशा वंदन तुजला आता गणेशा वंदन तुजला आता तुझ्या चरणी ठेवीतो माथा ||धृ|| कुशल बुद्धीचे दैवत तू रे आम्हां मुढास सुबुद्धी दे रे सुगम होवूदे गौळण वग कथा गणेशा वंदन तुजला आता ||१|| मुर्ती तुझी तुंदील तनू हासरी आनंदे भरती येई बघता नाचरी नृत्य गायने हरू दे रसीक व्यथा गणेशा वंदन तुजला आता ||२|| कला चौसष्ट चौदा विद्या पारंगत असशी विघ्नहर्ता सफल कार्य होई गण तुला अर्पीता गणेशा वंदन तुजला आता
काव्यरस

सावरकर आजोबा गेले.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही. मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.