Skip to main content

स्वीटकॉर्न चा फ़जिता अथवा उसळ

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 17/08/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
From Recipee
साहित्य :- स्वीटकॉर्न अर्धा किलो , बारीक चिरलेला कांदा १ वाटी, दोन मिरच्या, कोथिंबीर अर्धी वाटी, फ़ोडंईचे सा

शिवाजी महाराज

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/08/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या शुक्रवारी वडिलांच्या शाळेत गेलो होतो . तिथे पोरांना इंटरनेट शिकवले मस्त मजा आली .. मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ... पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज

बीटची बर्फ़ी

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 17/08/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : २ मोठे बीट, खवा अर्धा पावशेर, साखर १ मोठी वाटी,वेलदोड्याची पुड १ मोठा चमचा,बारीक तुकडे केलेले काजु अर्धी वाटी, १ चमचा तुप, बर्फ़ी वर लावायला चांदीचा वर्ख.
From

स्टफ़्ड मोदक करी

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 17/08/2010 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- तांदुळ पिठी,जाड भरडलेले ओले मटार १ मोठी वाटी आणि १ लहान वाटी स्वीट कॉर्न, तेलावर लालसर भाजलेला कांदा १ वाटी,बारीक चिरलेला कांदां १ वाटी , खोवलेले खोबरे २ मोठ्या वाट्या , ४ लवंगा,४ मिरे, दालचिनीचा १ छोटा तुकडा, ८/१० काजु, लसुण पाकळ्या ६/७, आले १ इंच, भाजलेले तीळ अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी, मीठ चवीप्रमाणे, तिखट २ चमचे, आले लसुण मिरची पेस्ट १ चमचा, १ वाटी चिरलेला टोमॅटो, तेल आणि फ़ोडणीचे साहित्य.

चार छोटुल्या...

लेखक वैभव देशमुख यांनी मंगळवार, 17/08/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
१ ठसे वाटेत बैलांच्या खुराचे दिसे डबक्यातले पाणी चहाचे उठे पाण्यावरी गोरे तरंग कुणाचे घासले पाण्यास अंग २ हवेचा येइ हिरवागार झोका झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा कसे हे साठवू सौंदर्य डोळी बहरल्या डोंगरावर रानकेळी ३ धुक्याचा सारला परदा हवेने उभे डोळ्यात हिरवेगार लेणे कळेना काय डोळ्यांनी टिपावे कळेना ओठ कोठे टेकवावे ४ निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची... - वैभव देशमुख

सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.!

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 17/08/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्री च्या रांगा बघून, त्यांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवून, सह्याद्री च्या प्रेमात न पडलेला माणूस, निदान मराठी माणूस तसा सापडणे कठीणच.! सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तामिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी हे होत ! http://www.amazingsahyadri.com/ योगेश ( Yogesh Kardile) यांची ही साइट जरुर पहा !!!

आठवणींच्या गाठी

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 17/08/2010 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु, पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।। परत एकदा लहान होऊ, पुन्हा आपण वर्गात बसू। वह्या उलगडुन रोजच्या प्रश्नांना, मग्न व्यापातून उत्तरं लिहीताना। थोडं थांबुन वस्त जिवनात, हरवुन जाऊ स्नेह बंधनात। सर्व जगच जिथे शाळा, पुर्ण आयुष्य त्याचा फळा। जे मिळाले ते नशिब कोरले, जे गमावले ते हसुन पुसले। आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु, पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।

संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!

लेखक शाहजहान मगदुम यांनी मंगळवार, 17/08/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
संयम आणि सबुरीच्या धाग्यावर बेसबरीने झालेली बरीचशी असंयत चर्चा वाचून आता धागा वाचनमात्र करावा असा संदेश संपादकांपर्यंत पोचल्याने धागा वाचनमात्र होत आहे! :) -संपादक मंडळ संयम आणि सबुरीचा महिना - रमजान! – शाहजहान मगदुम जीवन एक अखंड प्रवास. या प्रवासात मार्गक्रमण करणारा प्रवासी म्हणजे मानव. मानवास या प्रवासात काही अडथळे येऊ नयेत म्हणून अल्लाहनं प्रेषितांद्वारे वेळोवेळी मार्गदर्शनही पाठविलंय. आता मानवास आपल्या प्रवासात येणाNया अडचणींवर मात करण्यासाठी बरोबर न्यायवयाची शिदोरी म्हणजेच ईशपरायणता होय.

वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....

लेखक गांधीवादी यांनी मंगळवार, 17/08/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपण हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते. एकदा का आपले मत पेटीमध्ये गेले कि आपण परत लोकशाहीचे गुलाम होतो. नंतरची पाच वर्षे सरकार विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. फार फार तर आपण आंदोलने, चर्चा सत्रे, जनहित याचिका दाखल करू शकतो. पण परिणाम सर्वांना माहित असतात. पैसा कुठे, कसा व किती खर्च करायचा हे आपण सरकारला ठामपणे सांगू शकत नाही.