Skip to main content

मैत्रिणीचा मित्रच सुखी!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 18/08/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
सुख मानण्यात असतं हे विधान जरी खरं असलं तरी ते जाणण्यात मोठा आनंद दडलेला असतो. प्रत्येकालाच मैत्रीण लाभते असे नाही. परंतु ज्यांना एखादीचा सहवास जाणता आलाय तेच खरे जाणकार. त्यांना पुढच्या कोणत्याही गोष्टी नव्याने शिकाव्या लागत नाहीत किंवा त्यांचे नव्याचे नऊ दिवस मैत्रीच्या व्यवहारातच जुने झालेले असल्याने तेच खरे जुने जाणते बुजुर्ग म्हणून आत्मविश्वासाने काळोखालाही सामोरे जातात... मैत्रिणीच्या संगतीत पावन झालेली धरती अशा भाग्यशाली मित्रांना अनोळखी न वाटल्याने त्यांचा खेळ उंचावत जाणार हे निश्चित. माती तांबडी असली की तिला पुर्वानुभवाचा इतिहास असतोच असतो.

वाचायला विसरू नका - तुझा बाप मरेल

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 18/08/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात. राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच

कविता माझी होशील का ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 18/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी होशील का ? भेटलीस तू अवचित मजला, प्रीतिचा नव वसंत फुलला, प्राजक्त होऊनी वसंतातले, कवनी माझिया बरसशिल का ? कविता माझी होशील का ? रिमझिम रिमझिम पावसातल्या, च्रोरून अपुल्या भेटीगाठी, आठवणीत त्या चिब होऊनी, कवनी ओलेती प्रगटशिल का ? कविता माझी होशील का ? काय जाहले गमे न मजला, आभासे तू ठायी ठायी, आभासांचे गंध होऊनी, कवना गंधित करशिल का ? कविता माझी होशील का ? सांगायचे मज बरेच काही, मनांत तुझिया तसेच विरले, उकलूनीया ती गुपिते सगळी , कवन सांगता करशील का ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

Drinks ...मुली आणि मद्यपान!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 18/08/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..! काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या.

स्मशानात जागा हवी तेवढी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 18/08/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्मशानात जागा हवी तेवढी कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे? तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे? पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती? हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे? तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे? जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता? सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे? कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

पश्चिम महाराष्ट्राचे प्रेमगीत

लेखक अडगळ यांनी बुधवार, 18/08/2010 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना, भुईमुगानं हात द्यावा , तशी आलीस आयुष्यात तू , आंतरपीक होवून . मोर्चात माझ्या शर्टाला बिल्ला लावताना, जेव्हा म्हणालीस की अगदी शेट्टी सायबासारखं बोलता की ओ , तेव्हाच ओळखलं मी . म्हटलं , मळ्याला मालकीण गावली . एकदाची . पण आता बांधावर उभारून किती दिवस बघायची वाट ? झुगारून दे ही जुलमाची झोनबंदी , माव्या सारखा पसरलाय विरह. शिवारभर . तुझ्या ओठातून पिवू दे मला एन्डोसल्फान , तुझ्या श्वासाची भुकटी भुरभूरु दे माझ्या गात्रा गात्रावर फॉलीडॉल होवून. होवून जावू दे उभ्या देहाची साखर.
काव्यरस

बी आर टी, मेट्रो, मोनोरेल...Move over! थ्री डी एक्स्प्रेस येते आहे...

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 18/08/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्या-मुंबईतील (आणि खरं तर भारतातील सर्वच मोठ्या शहरांतील) वाहतूक व्यवस्थेवर पडणार्‍या ताणाबद्दल बरीच साधक-बाधक चर्चा माध्यमांतून वाचायला, ऐकायला आणि पहायला मिळते. या समस्यांवर BRT, Metro आणि Mono-rail सारखे उपाय सुचवले गेले आहेत, दिल्ली-कलकत्ता सारख्या शहरांमध्ये Metro यशस्वीही ठरली आहे.

(चार छोटुल्या)

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/08/2010 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
वैभव देशमुख यांच्या चार छोटुल्या हे शीर्षक पाहून आम्हाला ह्या चार छोटुल्यांची आठवण आली. लुईजा मे अल्कॉट यांची ही सुंदर कादंबरी आहे. वडील सैन्यात आणि मेग, जो, बेथ आणि अ‍ॅमी ह्या चार बहिणी आईसमवेत. ह्या सर्वांच्या भावविश्वाची ही कथा. ह्याचाच पुढील भाग गूड वाईव्स ह्या नावाने त्यांनी लिहिला आहे. शांता शेळके यांनी याचा "चौघीजणी" ह्या नावाने अनुवाददेखिल केला आहे. शिवाय, अमोल पालेकर यांनी यावर आधारीत एक मालीका (कच्ची धूप) ह्या नावाने बनवली होती.

कहाणी मंगळागौरीची

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/08/2010 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, 'अल्लख' म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिने नवर्‍याला सांगितली. त्याने तिला एक युक्ती सांगितली. "दाराच्या आड लपून बस, 'अल्लख' म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल." अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. "मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला. बोवा म्हणाले, "आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्रे परिधान कर, रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण.