Skip to main content

फुलं(आणि)पाखरं

लेखक jaypal यांनी शनिवार, 04/09/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने (खुप दिवसांनंतर) माझा म्यान केलेला कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या मुलाला घेऊन शुटआउटसाठी बाहेर पडलो. त्याने पण काही फोटो काढलेले आहेत केके(कृष्णकांत) असे लिहीले आहे. आत्ता सातवित आहे पण माझ्या बरोबर राहुन अ‍ॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय ;-). साईट वर गेल्यावर शेकडो फुल पाखर पिंगा घालत होती.त्या पैकी काही निवडक फुल(आणि)पाखर आपल्या आस्वादा साठी सादर.

अलविदा त्या रुम मालकांना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 04/09/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली.

प्रेमाचा आयकर

लेखक स्पा यांनी शनिवार, 04/09/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाचा आयकर मिसळपाव पाव टाकलेल्या आधीच्या धाग्यामुळे .... बऱ्याच जणांचा टिंगल करण्याचा विषय बनलो.... पण जे माझ्याबरोबर घडलं ते ... माहित नसल्याने हि प्रतिक्रिया अपेक्षित होती...... एकदा मिळालेल्या या चटक्याने.... पूर्ण कोलमडून गेलो होतो ... असो ... त्यावेळी असाच काहीतरी सुचलं ... कविता नाही म्हणून शकत... कारण मी कवी नाही... पण तरीही असंच मांडावस वाटतंय.... समजून घ्या ..... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... कारण....कारण....
काव्यरस

अपेक्षा!!!!, समज्-गैरसमज

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 04/09/2010 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
काका(मनातल्या मनात): माझ्या ओळखीमुळे त्याला नोकरी मिळाली, मग मला दोन चार वेळा गिफ्ट घेऊन भेटायला नको यायला त्याने? पुतण्या: किती वेळ/वर्ष उपकाराचे ओझे वाहु? आणि अपेक्षा तरी किती ठेवावी त्याने? मित्र १: चायला, ह्याचं लोन पास होत नव्हतं, मी शब्द टाकला तेव्हा पास झालं. आधी चार वेळा यायचा, फोन करायचा आता नाव काढत नाही.... हरामखोर साला.......... मित्र २: आता माझं काय चाल्लय मलाच नाहित, उपकार म्हणुन आता काय पाय धुवुन तिर्थ घेऊ का? काय कळत नाही ब्वॉ.. मित्र१: "चॅट" वर हॅलो... मित्र२: "ऑफलाईन" मित्र१: माजला साला, चार पैसे मिळाले, नोकरी मिळाली तर लगेच ऑफलाईन, गरज पडु दे..

अवचीत यावं कुनी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 04/09/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी हातामदी हात धरावा तुम्ही ||धृ|| आठवनीचे पाखरू उडती कंटाळ्यामधी रातदिस जाती सोबतीला कुणी असावं "कसं चाललं तुझं" पुसावं असं वाटत मनी ||१|| कालपासनं लवतो डावा डोळा नजर जायी दारी कितीक वेळा कुनीतरी भेटाया का येईल का रात अशीच एकटी जाईल वेडी शंका येई मनी ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/०९/२०१०
काव्यरस

मध्यपूर्वेतून थेट मराठीत

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 04/09/2010 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी आणि हिंदीत अनेक शब्द आहेत जे मूळचे फारसी वा अरबी आहेत. जसे गरीब, मेहनत, बिचारा, तारीख, हिशेब. असे शब्द बहुतेक वेळा हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसतात आणि त्याच अर्थाने वापरले जातात. वरील उदाहरणे त्याच गटातील आहेत. पण असेही काही शब्द आहेत जे फार्सी वा अरबीतून मराठीत आलेले आहेत जे हिंदीत नाहीत वा अगदी तुरळक वापरले जातात. काही उदाहरणे जाहिरात (हिंदीत विज्ञापन वा इश्तेहार वापरतात) जबाबदार(री) (हिंदीत जिम्मेदार(री) वापरतात) राजीनामा (हिंदीत इस्तेफा, त्यागपत्र). मोहीम (हिंदीत अभियान ) लष्कर (हिंदीत फौज) रतीब (?) अजून अशी काही उदाहरणे देऊ शकाल का?