शिक्षकांची परवड
'मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला दिन ढकलतांना आढळतात.
पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली.
मिसळपाव