Skip to main content

(बदली ड्रायव्हर)

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/09/2010 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीचे चालक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक गाड्या चालवण्यापायी मुळ गाडीवरची हात कमी बसत जातो. अशावेळी गाडी न वापरल्याने वा घसारा न झाल्याने गाडी गॅरेजमध्ये उभीच राहते. अशा गाडीवर लगेच बदली ड्रायव्हर उपलब्ध असेल तर गाडीची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबली ती गंजली म्हणतातच की. बदली ड्रायव्हर नावाची चीज कामचलाऊ असली तरी थांबून राहणार्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मैत्रीणींनो आपण बदली ड्रायव्हर घेवून धावतोय हे मुळ ड्रायव्हरला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मुळ ड्रायव्हरचा पत्ता मोठ्या विश्वासाने कट करावा लागतो. बदली ड्रायव्हर शोधावा लागतो.

आपली वैशालीतली भेट

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/09/2010 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी रवीवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, फर्ग्युसन समोरच्या वैशालीत. तू अमेरीकेहून नुकताच परतला होतास. बघण्याचा कर्यक्रम मोठ्या माणसांबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट. त्या रात्री अधीरतेनी, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता पोशाख घालायचा, त्यावर कोणते डूल घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला. तू जरी अमेरीकेत रुळलेला असलास तरी मी पहील्या भेटीत स्लीव्हलेस घालणं तुला कितपत रुचेल याबाबत मी साशंकच होते त्यामुळे ते रद्दबातल झालं. माझ्याकडे सुंदर शुभ्र पांढरा पोशाख होता पण अतिशुचितेचा काकूबाई रंग म्हणून त्यावर काट मारली गेली.

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/09/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला शालिनता गेली सारी कुठं, दिखावूपणा राहीला ||धृ|| आईवडील मोठे करती मुलाला आजारपणात साथ देती त्याला शिक्षण देती गुणाचा व्हायला म्हातारपणी मुलगा पांग फेडी वृद्धाश्रमी धाडी म्हातार्‍या आईबापाला जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||१|| शिक्षक विद्यार्थी नाते किती पवित्र असे शिष्य गुरूला आधी वंदन करीत असे आदराने मान झुकवूनी विद्यार्थी बोलायचा शिक्षकही आदर्श व्यक्ती त्याला बनवायचा आता शिक्षक
काव्यरस

स्टेपनीची गरज

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 13/09/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की. स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.

सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती

लेखक लीना सचिन चौधरी यांनी सोमवार, 13/09/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन -उत्सव त्याच्या मूळ उद्देशानुरूप साजरा करा ! १०७ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी समाजसंघटन, राष्ट्ररक्षण, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार व धर्मजागृति या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; परंतु सध्या उत्सवाच्या दरम्यान निधिसंकलनातील जबरदस्ती, गणपतीच्या दर्शनासाठी येणार्या महिलांशी असभ्य वर्तन, मंडपात मद्यपान करणे जुगार खेळणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, ध्वनिप्रदूषण अशा अनेक गैरप्रकारांमुळे उत्सवाचा मूळ उद्देश हरपला आहे.

भवताल

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 13/09/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मिपाला नुकतीच ३ वर्षे झाली . माझ्याही आत्तापर्यंतच्या वाटचालीत मिपाचा फार मोठा वाटा आहे .. म्हणुन हा लेख मिपाला आणि मिपाकराना अर्पण ..... भवताल .. परवा कॉलेजच्या गणपतीच्या मिरवणूकीत तीन तास नाच नाच नाचलो खरं, पण नंतर माझाच माझ्यावर विश्वास बसेना.. कधी काळी मिरवणूकीत साधा सहभागीही न होणारा मी, पण भवतालचा माहौलच असा होता की, You have to rock .. आणि एकदम डोक्यात सणक गेली . अरे आपला भवताल आपल्या नकळत आपल्यावर कीती अफेक्ट करतो. नाही का ? युरेका! युरेका !! माझ्या बर्यापचशा प्रश्नांची उकल झाली ना भाऊ..!

कसं सांगू मी तुला,

लेखक अमोल मेंढे यांनी सोमवार, 13/09/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू मी तुला, माझ्या प्रितीच्या फुला, तुझ्या वाचुनी मला, आता करमत नाही...... मी झालो वेडा-पिसा, हा रोग असा कसा, चारचौघांमधे मी, आता मिरवत नाही...... एकांतात बसुनी, तुझे चिंतन मनी, आठवण दुसरी, आता करवत नाही...... स्वप्नी छळते फार, खरं कधी येणार, मिठीत येना धीर, आता धरवत नाही..... मिठीत येना धीर आता धरवत नाही..... ही आमची उचापत
काव्यरस

२६/११ आणि सलमानची माफी

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 13/09/2010 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10… सलमान खानने असे विधान केले होते की २६/११ चा हल्ला हा पंचतारांकित हॉटेलांवरही झाला त्यामुळे त्याचा जास्त गाजावाजा झाला. त्या आधी अनेक हल्ले झाले, बाँब फुटले पण त्याला इतकी प्रसिध्दी मिळाली नाही. काही प्रमाणात हे नक्कीच खरे आहे.