Skip to main content

डबडेस्ट पुणेरी पाटी

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/09/2010 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक डबडेस्ट पुणेरी पाटी पॅथॉलॉजी लॅब च्या बाहेर ही पाटी होती ईट मे बी युरीन अ‍ॅन्ड स्टूल्स फॉर यू...बट इट्स अवर ब्रेड अ‍ॅन्ड बटर " "आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. स्पोक्स बसवून मिळतील , मुळव्याधीवरचे औषध मिळेल " ( ही पाठी पुणे स्टेशन बस स्टॅन्ड च्या जवळ पहावयास मिळेल ) आमचे येथे काजू ,अमसुल ,आणि परकर मिळतील ( स पेठेत मोदी गणपतीजवळ) तुम्हाला अजून अशा काही पुणेरी पाट्या माहीत असतील तर सांगा.

असा मी आसामीया...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 14/09/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे.. अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे".

हवी कशाला मग तलवार ?

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 14/09/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
हवी कशाला मग तलवार ? मकरंदाहुनि मधुर तरीही शर शब्दांचे धारदार तळपत असता जिव्हा करारी हवी कशाला मग तलवार ?......!! शब्दच असती कवच कुंडले शब्दच चिलखत होती शब्दच होती आयुधे ऐसी नभास भेदुनि जाती शब्द खड्ग अन शब्द ढालही परतवती ते हर वार.......!! नवनीताहुन मऊ मुलायम कधि कणखर वज्रे आसवांनी भिजती पापण्या कधि खळखळ हसरे हीनदिनांचे सांत्वन करिती गाजविती दरबार....!! भुंग्यासम शब्दांची गुणगुण कधि व्याघ्राची डरकाळी शब्द फटाके,शब्द फुलझडी कधि नीरवता पाळी जोशालागी साथ निरंतर कधि विद्रोही फूत्कार ....!! सृजनशीलता-करुणा-ममता संयम विभूषित वस्त्रे हजरजबाबी, तलम,मधाळहि परि कधि निर्भिड अस्त्रे

सहकार्य, मदत, सूचना, मार्गदर्शन हवे आहे...

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 14/09/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो का तसाच राहतो हे जाणून घ्यायचे कुतुहल मला निर्माण झाले आहे. मला निर्माण झालेल्या कुतुहलाला सांख्यिकीचे असंख्य पदर आहेत (आणि या त्याविषयात मी कच्चा आहे). असा अभ्यास करण्यासाठी वैकुंठ आणि तत्सम स्मशाने इथे विदा गोळा करावा की रुग्णालयात हा देखिल माझ्या मनात संभम आहे. तसेच असा अभ्यास कोणत्या बॅनर खाली करावा हा एक प्रश्न आहेच ( ज्योतिषाची चाचणी आयुका आणि अनिसच्या बॅनर खाली झाली होती). आपण या संदर्भात जर काही सूचना (तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत ) करू शकलात तर मला आनंद होईल. कळावे युयुत्सु

या कलियुगाच्या काळात माणसाने कसे वागावे ?

लेखक लीना सचिन चौधरी यांनी मंगळवार, 14/09/2010 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
या कलियुगाच्या काळात माणसाने कसे वागावे. कलियुगाच्या काळात कलीयुगा सारखेच वागावे कि कलियुगात सत्ययुगा प्रमाणे वागावे. आपले अभिप्राय कळवा

Paths of Glory

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 14/09/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे. पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

शब्दांचा अर्थ हवा आहे..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 14/09/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, बर्‍याच दिसापासून या एका अप्रतिम गाण्यावर काही रसग्रहणात्मक लिहायचा विचार आहे.. गेले अनेक दिस हे गाणं मनी घर करून राहिलं आहे.. परंतु तत्पूर्वी, 'मेरे मौला करम हो करम...' या त्या गाण्यातील पहिल्याच ओळीचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बरं होईल..'करम हो करम' म्हणजे काय? त्याचप्रमाणे या गाण्यातील 'बेकसो को सहारा मिले..' या ओळीतल्या 'बेकसो को..' या शब्दाचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बर होईल.. उत्तराच्या प्रतिक्षेत.. (चांगल्या चांगल्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकणारा) तात्या.

मदत हवी आहे

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/09/2010 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे जुन्या दुर्मीळ अशा गाण्यांच्या / संगीताच्या सुमारे दोनशे कॅसेटस आहेत. माझ्याकडील कॅसेट प्लेअर शेवटच्या घटका मोजतो आहे. आता कॅसेट प्लेअर दुरुस्त करुन मिळणेही अवघड होत चालल्याने मला (अत्यंत नाईलाजाने व मनाविरुद्ध) या कॅसेटस सीडी / एमपी ३-४-५ या स्वरुपात बदलून घेणे आवश्यक झाले आहे.

काळेवाडीचा पुणेरी पाहुणचार(?)

लेखक आपला आभि यांनी मंगळवार, 14/09/2010 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला. साडेसात-आठच्या सुमारास अभ्या उठला. थोड्या वेळ gallery मध्ये जाऊन त्याने आजूबाजूला नजर टाकली. (का म्हणून विचारू नका.) हळूहळू काळेवाडी आघाडी जागी झाली. (तशी ती चोवीस तास जागी असते कारण जहापन्हा पहाटे कधीतरी झोपतात.) मग नऊ वाजता बंगाना जाग आली. बंगानी थोडा वेळ पडल्या पडल्या विचार केला आणि मग पंख्याकडे नजर टाकली. (ती त्यांची खासियत आहे.) शेवटी बंगानी आता उठायला पाहिजे असा निर्णय घेतला. बंगांनी अंघोळ उरकून घेतली व खोलीला कडी लावून आतमध्ये रामरक्षा वाचायला चालू केली.