Skip to main content

भालचंद्र नेमाडे यांची महाकादंबरी 'हिंदू' - स्तुत्य पण फसलेला प्रयत्न

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 16/09/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच प्रकाशित झालेली आणि विविध कारणांमुळे चर्चित झालेली नेमाड्यांची 'हिंदू' कादंबरी वाचून काढली. कादंबरीचं ढोबळ मानानं कथासूत्र, प्रमुख पात्रं-प्रसंग वगैरेंबद्दल पूर्वी इतर ठिकाणी बरंच काही येऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याऐवजी आधी ते धागे वाचावेत अशी विनंती करून मला कादंबरीविषयी काय वाटलं याची मांडणी खाली करत आहे.

रसिया मुठिया

लेखक मितान यांनी गुरुवार, 16/09/2010 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एका गुजराती मैत्रिणीच्या सासूबाई बेल्जियम भेटीला आल्या आहेत. या गुजराती सुगरणीच्या हातचा एक पदार्थ परवा खाल्ला. चटकन होणारा , रुचिपालट म्हणून चविष्ट आणि रसदार असा हा पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणींसाठी - सामग्री - शिजवलेला भात - २ कप ( दुपारचा उरलेला असेल तर अजून उत्तम ) बेसन - अर्धा ते पाऊण कप ताक - ५ ते ६ कप आले लसूण पेस्ट - २ चमचे लाल तिखट - १ चमचा ( आवडीनुसार कमीजास्त करा) हळद - अर्धा चमचा हिंग , मोहरी, जिरे, कढिपत्ता, तेल फोडणीसाठी अर्धा चमचा साखर, एक चमचा तूप कृती - एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी घाला.

संस्कृत आणि संगणक

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 15/09/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते. बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते. भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे? त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का?

लुटा लुत्फ साध्या तांदळाच्या खिचडीचा :)

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 15/09/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, भुक लागणे आणि त्यासाठी कर्म करणे हे माणसाचे एक मुल्य आहे असे मला वाटते, ;) घराबाहेर असल्यावर घरच्या जेवणाच्या चवीची आठवण येणे सहाजिकच आहे. :) असो, लोकांना आवडेल असे जेवण नेहमीच बनवतो पण फोटो घ्यायचे नेहमीच विसरतो, पण आज भुक जरा कमी असल्याने आणि त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. शेवटी कमीत कमी शेवटचा फोटो घेतलाच. :) बाहेर खायची इच्छा नसल्यास आणि भुकेवर साधा सरळ घरगुती उपाय म्हणजे तांदळाची खिचडी.

द अंग्रेज

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 15/09/2010 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे.

दबंगला शुभेच्छा

लेखक अविनाश पालकर यांनी बुधवार, 15/09/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर. मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले. आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली. एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात...

माझ्या झोपेची झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा. आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ|| दिसभर मी राबराबतो कष्टानं दमून जातो किती आटवन तुझी मला येई कामामदी बी लक्ष लागत न्हाई दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ माझ्या झोपेची झाली आता येळ ||१|| कधी दिवसपाळीत दिस जाई कधी रातपाळी आडवी येई हातामधी हात तुझा कधी मी घेई? त्यासाठी ज
काव्यरस