Skip to main content

मुसलमानांसाठी राखीव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/09/2010 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
मुसलमानांसाठी राखीव काल आय बी एन मधे एक सनसनाटी बातमी बघत होतो..एका गुप्त चौकशी मधे असे आढळले कि मुसलमान लोकांना कुणीच फ्लाट विकत ना्ही, व जागा हि भाड्याने देत नाहि..मुंबई व दिल्लीच्या लोकांची पहाणी केल्यावर असे आढळून आले कि ८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. यात अनेक शिकलेल्या घर मालकांचा हि लोकांचा पण भरणा आहे. .इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि..... यावर मार्ग काय? नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का?.

माहीत नव्हतं...

लेखक अथांग यांनी शुक्रवार, 17/09/2010 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
नशीबाला दोष देता देता नशीबाचा कौल घेता घेता, नशीबात तू पण असणारेस..... माहीत नव्हतं ! खडतर पायवाट तुडवत जाता काट्यांना त्यावर चुरडत फिरता, फुलासारखं तू जपणारेस..... माहीत नव्हतं ! अस्ताव्यस्त आयुष्य विखरता कणा-कणाने झुरता-झुरता, आपसुक, अलगद सावरणारेस..... माहीत नव्हतं ! आत खोल काहीसं तुटता मरत-मरत जगता-जगता, श्वास होऊन तारणारेस....... माहीत नव्हतं !!!

एका (अज्ञात) सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 16/09/2010 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. तरुण विजय यांचे टाइम्स ऑफ इंडियावरील ब्लॉग्ज हल्ली वाचनात आले व मला आवडले. श्री. तरुण विजय यांचा परिचय करून दिला जातो तो असा: सिंधु नदीवरची झुळूक, कैलास पर्वतावरचा शिवमंत्र, चुशुलमधील सफर, गोठलेल्या झंस्कारवर चादर पांघरून मारलेली चक्कर. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे श्री तरुण विजय! ते श्यामाप्रसाद मुखर्जी रीसर्च फाऊंडेशनचे संचालक असून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

माझी मास्तरकी !

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 16/09/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातली बुधवार पेठ 'अनेक गोष्टींसाठी' प्रसिद्ध(!) आहे.याच वस्तीतल्या लोकांशी माझा अगदी जवळचा सबंध आलेला आहे त्याविषयी थोडंसं.... २००६ सालची गोष्ट्,पुण्यातल्या माझ्या एका ओळखीतल्या एका गृहस्थांनी 'मामाचं गाव' असा एक उपक्रम राबवला होता. कुणासाठी? तर ज्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जायसाठी मामाचं गावच नाही अशां मुलांसाठी. ही मुलं कोण? तर बुधवार पेठेतल्या वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रियांची! ही मुलं ८ दिवस रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आमच्याकडं येत. त्यांना रमवण्यासाठी आम्ही रोज वेगवेगळे खेळ्,चित्रकला,मातीकाम इ.

एका तेलियाने (पुस्तक परिचय)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 16/09/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
ekaa teliyaane ’शेख अहमद झाकी यामानी !’ नाव ऐकलंय? किंवा ऐकल्यासारखं वाटतंय ? ’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं.

चला मित्रांनो, 'आयटीवाला नवरा' होऊ यात !!

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 16/09/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
हेतु : सहज-गंमत-जम्मत ..कोणालाही दुखवण्याचा हेतु नाही. " देखा है पहली बार साजन ".... कधी नव्हे ते ,माझ्या भ्रमणध्वनीवर, सदाशिव-पेठी, पर्‍याच्या फोन आलेला पाहुन,मी ,डॉन्याचा एकोळी प्रतिसाद बघुन जसा धम्या दचकतो,तसा दचकलो.फोन न घेण्यासारख दुसर काहीही कारण समोर न आल्याने मी फोन ऊचलला.तसेही आमच्या मोबाईलात ईनकमिंग फ्री असल्याने आम्ही सगळेच फोन उचलतो.(सध्या वोडाफोनच्या डायलर ट्युन्स प्रमोशनल कॉल्सनी झ्झीट्ट आणली आहे,ते देखील कन्नडात सुरु होतात, निव कर माडिद्रे का असल कायतरी ?). तर फोन ऊचलला (न घेऊन सांगतो कोणाला ? उद्या खरडवहीत " आर्थिक परिस्थितीने गाजुंन आपण आपला फोन गहाण ठेवला आहे काय?

१९४३ मधल्या बंगालमधील दुष्काळातील लाखो गरिबांच्या मृत्युस चर्चिल जबाबदार आहे का?

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 16/09/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.outlookindia.com/article.aspx?266849 ह्या दुव्यावर एका पुस्तकासंबंधी काही माहिती दिली आहे. सर्व माहिती आंग्ल भाषेत आहे ती मुळातुन वाचलेली बरी राहिल. कृपया सवड मिळेल तेव्हा जरुर वाचा. सदर लेखावर जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

फुकटचा सल्ला

लेखक सदानंद ठाकूर यांनी गुरुवार, 16/09/2010 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
फुकटचा सल्ला खर पहाता असे म्हणतात कि कोणी विचारल्याशीवाय आपला सल्ला देऊ नये तर समर्थ म्हणतात आपणासी जे जे ठावे ते दुस-यासी सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जना! असो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आपले काम फुकटात सल्ला देण्याचे मग तो कोणी मानो अथवा न मानो, शेवटी मर्जी ज्याची त्याची. जून २०१० चे एम् आर पी नुसार (तेव्हा सेंसेक्सची एम् आर पी १९२९५ होती व सध्या बाजार १९५०० पेक्षा जास्त आहे, म्हणजेच सध्या शेअर बाजारातील बहुतांशी कंपन्यांचे समभाग बरेच प्रमाणात महागात उपलब्ध आहेत. म्हणजेच त्यांच्या किंमती खरे पहाता अवास्तवच आहेत. जय परदेशी अर्थसंस्था!

फसू नका तुम्ही फसू नका

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/09/2010 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
फसू नका तुम्ही फसू नका
विज्ञानाची कास धरा तुम्ही ज्योतिषांच्या नादी लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||धृ|| लांब दाढी कपाळी टिळा बोटात अंगठ्या गळ्यात माळा समोर पोपट चिठ्ठी काढतो त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय? अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका फसू नका तुम्ही फसू नका ||१|| देई गंडा ताईत दोरा अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा
काव्यरस