Skip to main content

भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स

लेखक वर्षा यांनी सोमवार, 20/09/2010 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे.

पाऊस..

लेखक अथांग यांनी सोमवार, 20/09/2010 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेला आसमंत पाऊसही दाटून आलेला.. उदास उदासी सर्वत्र, पण मी - आनंदी, उत्साही, मजेत ! किती दिवस गुदमर ही स्वतःबरोबर वागवणार ? श्वास घेण्याचं सोंग, किती - कसं वठवणार ? मलाही तर मोकळं व्हायचंच होतं मुक्त हसून बघायचं होतं मनातलं मळभ माझ्या आता विरळ झालंय, कोसळत्या पावसात चिंब भिजायला.. खूप - खूप आतुरलंय.. म्हणुनच वाट पहातेय - दाटलेल्या पावसाची...... तो भरभरून पडेल तेंव्हा, निथळेल माझ्या सर्वांगावरून मनातील क्लेशांचा पूर त्याच्याशी एकरुप होऊन.. आणि मग चेहर्‍यावर फक्त उरेल ते - एक शांत, निरागस, पण 'हुकमी' हसु !!!

ठेवू अम्ही विश्वास

लेखक पॅपिलॉन यांनी रविवार, 19/09/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन मॅकक्रे ह्यांच्या In Flanders Field ह्या कवितेला We Shall Keep The Faith ह्या कवितेने उत्तर दिले आहे मोनिका मायकल ह्या अमेरिकन कवयित्रीने. त्याच कवितेचा हा स्वैर अनुवाद. तुम्ही सोपवलेल्या मशाली, विश्वास आम्ही जपू अविरत! लालभडक खसखशीची फ़ुले रणांगणावर पसरलेली देताहेत संदेश आभाळाला फ़्लॆंडर्सच्या रणावरील ते रक्त केवळ अविस्मरीणयच! ही मशाल आणि ही फ़ुले नेहेमीच आठवण करून देतील फ़्लॆंडर्सच्या रणात शांतपणे निजलेल्यांची! मूळ कविता Oh!

फ्लँडर्साच्या रणामध्ये

लेखक धनंजय यांनी रविवार, 19/09/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लँडर्साच्या रणामध्ये मूळ कविता इंग्रजीमध्ये; कवी : जॉन मॅकक्रे. फ्लँडर्साच्या रणामध्ये स्थानदर्शक आमचे क्रूस आहेत रोवले - त्यांच्या रांगां-रांगांंमध्ये फुलतात रानफुले. वरती आकाशामध्ये धजून अजून थवे चंडोलांचे उडणारे ऐका अंधूक गाणारे, बंदुकींच्या बारांमध्ये. कोण आम्ही? आम्ही मृत.
काव्यरस

`दबंग'च्या यशाचे इंगित काय?

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/09/2010 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
सलमान खानचे "स्टारडम' आणि दोन-तीन चांगल्या फाइट्‌स, एवढ्याच बाबतीत "दबंग' जगावेगळा, विशेष म्हणावा लागेल. अन्यथा कॉमेडी नाही, जबरदस्त पटकथा नाही, चक्रावून टाकणारी वळणं नाहीत, नायक-खलनायकाच्या दमदार कुरघोड्या नाहीत...असं असतानाही "दबंग' एवढा का चालतोय? का गाजतोय? टाळ्या-शिट्ट्या खेचणारे संवाद, हे एक कारण असू शकतं. पण फक्त तेवढंच? बाकी काय असावं? तुम्हाला काय वाटतं? (विशेष सूचना ः "दबंग' पाहिलेल्या व्यक्तींनीच या विषयावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. तो न पाहता प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या तज्ज्ञतेबद्दल पूर्ण मान राखूनही, त्यांनी आधी चित्रपट पाहावा, ही विनंती.)

वॅब साईट

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 19/09/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला एखादी वेब साइट बनवायची असेल तर त्या साठी काय कराव लागतं ? त्याची प्रक्रिया काय ? याची माहिती देणारा सविस्तर लेख ऑन लाइन कुठे वचायला मिळेल कॄपया मार्गदर्शन करवे

माज

लेखक सविता यांनी रविवार, 19/09/2010 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याला उगाच माज आहे एखाद्या गोष्टीचा असं वाटून किती वैतागतो आपण कधीतरी..... माझ्या घराच्याजवळच एक सायकलचे दुकान होते."जयनाथ सायकल मार्ट". हवा भरणे, किरकोळ दुरुस्ती अशा प्रकारचे एक १५ बाय १५ जागेत थाटलेले जुनाट दुकान होते ते! दुकान तसे यथा तथाच पण बहुतेक त्या एरिया मध्ये तेव्हा असेलेले एकमेव सायकलचे दुकान असल्यामुळे चांगले चालायचे... दुकानाचा मालक एक गतकाळीचा पहिलवान होता.....म्हणजे ते मला दुकानात लावलेल्या फोटोवरुन कळले होते. पहिलवान गल्ल्यावर बसण्यशिवाय आणि एखाद्या आलेल्या मित्राशी तास न तास गप्पा मारण्याशिवाय काहीच करायचा नाही.