Skip to main content

दहीबुत्ती

लेखक मितान यांनी सोमवार, 20/09/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते ! अशी ही माझी आवडती दहीबुत्ती- सामग्री : - भात दही फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप. कृती: १ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा. थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे. फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे.

का होत असेल हो असं !?

लेखक चिगो यांनी सोमवार, 20/09/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा. जरा चावून चोथा झालेल्या, मेंदुचा भुगा करणार्‍या प्रश्नावर विचार करतोय. आजच बातमी कळली की माझ्या एका सहकार्‍याने, बॅचमेटने आत्महत्या केली? का केलं असेल त्याने? मुलगा दिसायला चांगला, घरची परिस्थिती उत्तम.. अगदी दर दोन आठवड्यांनी विमान प्रवास करु शके, इतकी. त्याच्या लग्नात त्याने एका प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे अश्वपथाचे संचालन करण्याचा मान मिळवलेला.. नोकरी कुठल्याही आई-वडीलांना अभिमान वाटावी अशी.. वन ऑफ द बेस्ट अ‍ॅथलिट्स आय हॅव सीन.. सगळं कसं आलबेल (दिसायला तरी)... ....

खानदेशी शेव भाजी

लेखक रश्मि दाते यांनी सोमवार, 20/09/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गावाहुन येता येता वाटेत जळगाव लागले चहा करीता थांबलो तर मस्त भाजीची शेव दिसली म्हंटल चला घेउन जाउ शेव घरी आज भाजी केली होती तर वाटल डकवु या मि पा वर शेव भाजी साहित्य: कांदे २+१ सुके खोब्रे ५० ग्राम खसखस २ चमचे धणे २ चमचे जीरे १ चमचा शेंगदाणे मुठभर तीळ २ चमचे लवंग ४ काळे मीरे ६-७ लाल तिखट २_३ चमचे हळद १ चमचा मिठ चवीनुसार लसुण ५_६ पाकळ्या आलं १/२ इन्च कोथिंबीर मुठ्भर तेल १/४ वाटी पाणी गरजेनुसार शेव २५० ग्राम सोबत भाकरी,कांदा आणी लिंबु हवेच आणी तिखट सहन होत नसल्यास ताक किंवा दह्याची वाटी मस्ट २ कांदे आणी खोबरे आचेवर खरपुस भाजुन घ्यावे खसखस,जीरे,धणे,लवंग,मीरे,तीळ,दाणे सर्व कोरडे भाजुन घ्

सल्ल हवा आहे

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 20/09/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकताच पुण्यात आलो. पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या. सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्‍यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो . एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अ‍ॅडजस्ट झाले.

(तथास्तु !!)

लेखक चेतन यांनी सोमवार, 20/09/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनुप्रियाची तथास्तु !! वाचुन विडंबन करावे असे वाटले नाही (खर तर तसा कवितेचा विषय विडंबावा असा बिल्कुल नाही आहे ) तरिपण रिकामा वेळ असल्याने थोडासा हा नराधमपणा....
काव्यरस

भेट तुझी......मंतरलेली!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 20/09/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
.. क्षण मंतरलेले .. . तू येण्या आधीची ती हुरहूर ...अजून जाणवते मला. अस्वस्थ मन.....हृदयाची ती किंचित थरथर ....एखादा चुकलेला ठोका...आताही जाणवतो मला.. तूला पाहताक्षणी..मनभर आणि तनभर पसरत गेलेली गुलाबी सरसर .. ....माझ्याच गालांचा बदललेला वर्ण..ओठांवर अकारण उमलेले स्मित ...त्याही पेक्षा.. हे सारं जाणवलेली तुझी नजर, आणि तुझ्या त्या नजरेने पुन्हा सैरभैर आणि अस्वस्थ मी... अजून आठवते मला .. तू जवळ असतानाचा हवेचा गंध.... तुला स्पर्शून येणारी मंद रेशीम झुळूक.. सैलावलेलं मन..एखादा नकळत ...

शोध्

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 20/09/2010 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
me onjalit majhya tujhech pratibimb pahate Ankhand tujhya kurpechya sagarat nahate Tu bhetshil kevha?? tujhi vat pahate, Antaratle kavya anatarich re rahate.....

फ्लॅंडर्सची फुलं (भावानुवाद)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 20/09/2010 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच धनंजयने केलेला फ्लँडर्साच्या रणामध्ये हा उत्तम अनुवाद वाचला. धनंजयने आकारबंध जसाच्या तसा ठेवून, कवीप्रमाणेच मोजके शब्द वापरून ते भाषांतर केलेलं आहे. मात्र ती बंधनं पाळताना मूळ कवितेची धार थोडी बोथट झाली असं मला वाटलं. ती धार तशीच ठेवण्यासाठी मी भावानुवाद केलेला आहे. अर्थातच त्यासाठी कवितेचे काही शब्द, रचना व संकल्पना बदलाव्या लागल्या आहेत. (उदाहरणार्थ मूळ कवितेत खड्ग, भाले यांचा उल्लेख नाही...) ओळी वाढलेल्या आहेत. मूळ कवितेतलं मीटर बदलून आलेलं आहे.

हे मृत्यो तू काय करी

लेखक शुचि यांनी सोमवार, 20/09/2010 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
बाळाला जर पंख दिले, संस्कार दिले मी शुभंकरी, अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती हे मृत्यो तू काय करी||१|| सहचार-अपेक्षापूर्ती करी, उतरतसे कसोटी अनुदिनी अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती हे मृत्यो तू काय करी||२|| मात्यापित्यांस शांती दिली, कण फेडीले ऋण अपुलेपरी, अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती हे मृत्यो तू काय करी||३|| मित्रास लावला जीव जरी,उत्तेजनही दिधले परोपरी, अवचित कधी आलास तरी, झडप घातली मजवरती हे मृत्यो तू काय करी||४|| आदर्श जिणी रमता अनुदिनी,एके दिनी जायचे मिटूनी, सरणावरती शांत मनानी, जाईन तुला मी सामोरी ||५||
काव्यरस