Skip to main content

अनंत.....

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 23/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोहोळ्यातुन सोहळ्याकडे चालले आयुष्य सारे, सोहळा हरेक घडी क्षणी बदलताच वारे ॥ चाहुल लागता जन्माची प्रथम सोहळा घडे, मातृपद देउन तिजला हळुवार पाउल पुढे ॥ नामकरण अन उष्टावण भरभरुन जमती जन, वाढदिसांची त्यातच गणती वर्षांचे उठवुन व्रण ॥ सोहळे शिक्षणा आधी सोहळे शिक्षणा नंतर, कळे न जीवनी कशास सोहोळ्यांचा हवा मंतर ॥ सोहळा प्रत्येक पायरी विवाह; नोकरी; यश भर त्यातच सणासुदिंची उस्तव, आठवुन तो ईश ॥ आला संपत जन्म पण सोहळे पुरुन उरले, रौप्य, सुवर्ण, हिरक जरतारी वस्त्र लाभले ॥ उपस्थिती चे संपले सोहळे अन, अनुपस्थिती आता, श्राद्ध, वर्षस्मरण, पुण्यतीथीच्या घडती जनात बाता
काव्यरस

मीमीची गोष्ट

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 23/09/2010 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीमी एका भरल्या कुटुंबातली मुलगी. ह्या कुटूंबाचा एक असा काही पत्ता सांगता येणार नाही. शोधले की कुणीही सांगेल. प्रत्येक पेठेत अशी घरे आणि घरा घरात अशी माणसे दिसतील. विविधतेत एकता म्हणा हवे तर! घरी आजोबा-आजी, बाबा-आई, लग्न झालेला मोठा भाऊ-वहिनी, त्यांचे छोटे बाळ, आणि ताई, असे मीमीचे भरगच्च कुटुंब. आजोबा, आजी, भाउ वगैरे नाती त्या त्या लोकांविषयी बोलतांना काही नावे द्यायची म्हणून दिलेली नावे. नाहीतर मीमीचे कोणाशी खास असे नाते नाही. नेहमी आपल्या आपल्यामधेच गुरफ़टून असते ती. मात्र ह्या सगळ्यांची मीमी ही एक अतिशय लाडावलेली मैत्रीण. अगदी वाया गेलेलीच म्हणा ना! पण नको. तसे नाही म्हणुया.

मुंबई

लेखक अथांग यांनी गुरुवार, 23/09/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी तुम्ही म्हणाल, सध्या सण-वारांचे दिवस, सर्वत्र उत्साही वातावरण. थोडक्यात 'आल इझ वेल' असताना, ही कुठल्या रसाची कविता का पब्लिश केली आहे? त्याचं काय आहे की अनेक सल, जखमा, व्रण वागवत आपली वाटचाल सुरु असते. जो जिवंत आहे त्याला जगणे चुकत नाही. परंतु, काल नेट वर कहीतरी शोधत/वाचत असताना मुंबईतील हल्ल्यांचा व स्फोटांचा संदर्भ आला व त्या अनुशंगाने तेंव्हा लिहीलेली ही कविता आठवली. जखमेवरची खपली निघाली व ती जखम उघडी पडली.. तुम्हाला दु:खी करण्याचा किंवा नको त्याची आठवण करून देण्याचा मानस नक्कीच नाही.

वडिलोपार्जित मालमत्ता

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 22/09/2010 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एका दिवशी भारतात दोन बालके जन्मली. एक होते अब्जोपती कारखानदाराचे मुल तर दुसरे जन्मले त्याच कारखान्यातल्या शिपायाच्या घरात. केवळ मुल म्हणून बघितले तर दोघेही सारखी. एकाच वयाची, एकाच वेळी जन्मलेली. फक्त ते कोणा पोटी जन्मले या फरकाने त्यांचे एकूण आयुष्य एकमेकांपेक्षा वेगळे असणार हे नक्की. अश्या वेळी ह्या दोघांना मिळणार्‍या संधीमधे कमीत कमी फरक निर्माण व्हावा म्हणून सरकार विविध उपाय योजना करते. जसे निम्न उत्पन्न गटासाठी आरक्षण, मागास जमातींसाठी शिक्षण व नोकरीमधे आरक्षण, शिक्षणाच्या फी मधे सवलत अथवा सुट, शिक्षण घेतायेण्याच्या पात्रतेत सवलत/सुट वगैरे वगैरे.

मदत

लेखक केशवपुत यांनी बुधवार, 22/09/2010 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
मदत हवी आहे... आपणाकडे "शिक्षक" , "मित्र" ह्या विषयांसंबंधीचे काव्यलेखन असेन तर कृपया द्यावे. आपणास एखाद्या जाला बद्द्ल माहिती असेन तर ति प्रसारित करावी. धन्यवाद!!!

गझल

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 22/09/2010 16:37 या दिवशी प्रकाशित केले.

पुढल्या वर्षी लौक्कर या...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/09/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या कृपाशीर्वादाने मिपा सुरू झाले तो आमचे लाडके दैवत असलेला लालबागचा राजा मुंबैचा मुक्काम आटपून आज निघाला.. लालबागच्या राजाचा रुबाब अन् त्याची शान.. लै भारी.. सर्व मिपाकरांतर्फे त्याला अलविदा.. बाय बाय.. टाटा..:) गंपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौक्कर या!

सर्वधर्मप्रेम !

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 22/09/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
साध्याचे मीपा वर प्रकाशित झालेले काही लेख आणि अयोध्धेचा निकल ह्या पार्श्वभूमी वर सर्वधर्मसमभाव आजूबाजुला मला कुठे दिसतो ह्या साठी प्रपंच ! पहिला किस्सा लग्ना नंतर आम्ही सध्या राहत असलेल्या घरी भाढ्याने रहवायस आलो. आमचा मजला म्हणजे एक छोटा भारत असावा , आम्ही हिंदू , समोरच घर मुस्लिम , शेजारी ख्रिचन जैन आणि अजुन एक हिंदू. अश्या एकदम कॉसमपलिटिन शेजार म्हणजे आम्हाला सॉलिड धाकधुक होती , खासकरून घरी येणारे सर्व पाहुणे समोरच फ्लॅट वरच मुस्लिम नाव पाहून नाक मुरडायचे.