नीळा पक्षी
साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत
पण अजूनही नीळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी नीळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपीत नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं.
मिसळपाव
