Skip to main content

झुरळांचा बंदोबस्त

लेखक अभिमोहित यांनी शुक्रवार, 24/09/2010 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
किचन ट्रॉलीमधे फार झुरळं होतात बुवा! कसा बंदोबस्त करावा? आपला सल्ला मिळाल्यास आभारी आहे.

माझे पहिले गीत ..

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 24/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
गीत ऐकण्यासाठी खालील ब्लोग ओपन करावा, आणि उजव्या प्लेयर मधील पहिले गाणे लावावे. www.jayshreeganesha.blogspot.com गाण्याचे नाव : झाडांच्या पानात शब्द : गणेशा. गायिका: स्वप्नजा लेले. संगितकार: सत्यजीत केळकर. अल्बमः ये ना तू सख्या ... नोट: नविन असल्या कारणाने गीत कसे अपलोड करतात ते माहीत नाही , शमस्व , एकदा पहिले गाणे ऐकुन बघा, निश्चित मजा आल्या शिव्फाय राहणार नाही अशी वेडी आशा आहे
काव्यरस

तू येतोस ...

लेखक ढब्बू पैसा यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच. जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर.
काव्यरस

खेळ मांडियेला...

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
"काय करायचं, बोला लवकर." (फलित गिळोत चिंतातूर दिसत होते.) "कशाबद्दल?" (कृष्णेश आजताडी शिल्पा आणि करीनाचे फोटो न्याहाळत उद्गारले. त्यांच्या चेहर्‍यावर अगदी करूण भाव आले होते. या मुलींना आपल्या महान देशात अंगभर कपडे देखील घालायला मिळत नाहीत याची खंत त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. आणि असले फाटके कपडे घालून यांना जनतेला सामोरे जावे लागते याचेही त्यांना अतीव दु:ख होत असल्याचे दिसत होते.) फलित गिळोत (फगि): अहो, इतकं सगळं सांगीतलं नं मी...त्याच्याबद्दल... कृष्णेश आजताडी (कृआ): अरे हो...त्याच्याबद्दल ना...काही काळजी करू नका.

कोलंबस-२

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 24/09/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या पाक कृतीचा आस्वाद अगदी निवांत दिवशी च घ्यावा. अर्थात ह्या दिवशी कुठल्याही अदर अ‍ॅक्टीविटीज ना थारा नसावा. कुठल्याही नाही. गरमागरम भात आणि आमटी बाबत मॅनियॅक असलेल्यांसाठीच ही पाकृ आहे. दोन पेग घेतल्यावर जी नशा चढते त्याचा अनुभव येतो. उगाच दोन मुद भात एक डाव आमटी वाल्यांनी वाटेस जाउ नये. ----------------------------------------------------------------------------------------- "सिक्रेट काय"? त्यात कसले आहे सिक्रेट? " त्याशिवाय का १०००० लोकांसाठी वडाळ्याच्या गणपतीत बनणार्‍या कोलंबस ची चव फक्त १० लोकांसाठी बनवलेल्या पाकृ ला येते?" १० नाही २०.

भांडूपचा गणपती बाप्पा : ठिय्या आंदोलन

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/09/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक बातमी आहे लिन्क http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6617954.cms भान्डूपच्या एका मंडळाची गणपती मूर्ती ही जागेवरून हलायला तयारच नाही. भांडूप येथील टेंभीपाडा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीबाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जंगी तयारी केली होती. परंतु आश्चर्य म्हणजे जवळपास तीन-चार तास सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी आणि २०-३० कंत्राटी कामगारांनी शर्थीचे प्रयत्न करूनही गणपतीबाप्पा जागेवरून अजिबात हलले नाहीत.

पाचवी ’क’ परंपरा पाळतो

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/09/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
खाटोळी बुद्रुक गावी पानतवणे पाटलांनी मागील वरशीपासून कळशीबाई पानतवणे पाटील माध्यमिक शीकशण सौंस्ता सुरू केली होती. आत्तापावरतो चौथीच्या फ़ुड शिकशाण घेयला धा कोसावर्च्या तालुक्याला जाव लागायच. पानतवणे पाटलांचा पोरगा जीतू, चौथी पास झाला, तेव्हा केवळ त्याच्यासाठी म्हनून पाटलांनी आपल्या स्वरगीय पत्नीचे नांव देऊन माध्यमीक शाळा सुरू केली. दमादमानं वाढवू म्हनून आधी येकच वर्ग म्हनजे इयत्ता पाचवी सुरू केला. आता दमादमानं वाढणार म्हनजे दर वर्शी जीतूबरोबरच फ़ुडच्या वर्ग सुरू होनार हे सगळ्यांना ठावं होतंच. घरबसल्या आपली पोर म्याट्रीकपातूर जाणार म्हनून गाववाले पाटलांवर खूष होते.

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट. चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.