Skip to main content

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?

लेखक गांधीवादी यांनी शनिवार, 25/09/2010 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
हि धरती आपल्याला आंदन म्हणून दिल्यासारखी मानवाची वागणूक आहे. ह्या धरतीवर केवळ आणि केवळ मानवाचाच हक्क असल्यागत मानवाची इतर प्राण्यांबाबत क्रूर वागणूक असते. हि क्रूर वागणूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. स्वतःच्या सुखासाठी, चवीसाठी, सौंदर्यासाठी मानव हा इतर प्राण्यांचा बळी देताना जराही मागे पुढे पाहत नाही. मुख्यत्वे मांस, दंत, आणि कातडी यासाठी मानव स्वताच्या हव्यासासाठी त्याची हत्या करतो.

निसर्गाची भाषा

लेखक शुचि यांनी शनिवार, 25/09/2010 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आई फक्त माणूसच बोलू शकतो का? नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते. ____ चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे वार्‍याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१|| पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२|| कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३|| मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||
काव्यरस

धोंडू आणि धोबंग

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 24/09/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
एका अज्ञात ठीकाणी खलबतं चालली असतात- मलईखा पोरा: छैया छैया करून करून मी नाच नाच नाचून दमले गो बाई. नंतर हे बेबी, ते बेबी, घे बेबी, दे बेबी केले. मग हाऊस फुल्ल झाले. पण म्हणावेसे यश मिळत नाही आहे मला. अर्रर्र बास खान: आरं आरं आता बास की. काय हे अभद्र बोलतेस! माझ्या डोस्क्यात भन्नाट आयडीया आहे. ती आपण प्रत्यक्षात उतरवू या. मसल्स खान: हॅल्लो ब्रदर! सांग ना मला सुद्धा ती आयडीया. मी पण पार्टनर मध्ये शरिराचे सगळे सिक्स पॅक अ‍ॅबचे पार्ट पार्ट दाखवले. "नर" असल्याचा फायदा घेवून मसल्स चे "पार्ट" दाखवून पार्टनर चित्रपट केला. मग मी अनेकांना "वान्टेड" होतो.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

पुढच्या वाटचालीत, अर्थात "गोइंग फॉरवर्ड"

लेखक विकास यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रकूल स्पर्धेसंदर्भात अनेक चर्चा येथे आणि इतरत्र, तसेच वास्तव जगात चालू आहेतच. त्यातील सगळा सूर केवळ हुकमी एक्क्यामुळे अर्थात कलमाडी मुळे अथवा इतर काही हुकमांच्या पानामुळे पक्षी: सत्ताधारी राजकारण्यांमुळे झाले असा आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. त्याच्याशी सहमत देखील आहे. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा जर कायद्याने होऊ शकली तर इतरांना देखील चांगला संदेश मिळू शकेल असे वाटते. मात्र पत्यांमधील हात केवळ हुकुमाची पानेच करत नाहीत.

फ....फ....फ....फ्लोरिडा

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 24/09/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
दोन-तीन विकांतापुर्वी फ्लोरिडाला जाण्याचा योग आला.. त्यातले काही निवडक फोटू खाली देत आहे. १. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त २. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त ३. सेंट पीट्स बीच ४.

आमचा नवसाला (न) पावणारा.....

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 24/09/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, सर्वात आधी क्षमाच मागतो. अहो त्याचं काय आहे की, बोलवायचं-बोलवायचं करून राहूनच गेलं बघा. नाही म्हणजे, हल्ली आमच्याकडच्या गणपतीला सार्वजनिक ठेवलाच नाहीये आम्ही. फक्त निमंत्रितांनाच बोलावतो. म्हणजे कसं आहे बघा की वर्गणीदार आणि ऊत्सवकाळात त्यांच्या घरी आलेले पाहूणे, एवढेच लोक मिळून गणपती साजरा करतो. वाटलेलं, इकडच्या सर्व मंडळींना आमंत्रण (की निमंत्रण, जे काय असेल ते) धाडेन या वर्षी, पण नाही जमलं. काय विचारलत, आमच्या मंडळाच्या गणपतीमधे विशेष काय म्हणून? अहो, आमच्या मंडळाचा गणपती आहे ना त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याच नवसाला पावत नाही.