Skip to main content

एका नव्या सभ्यतेची ओळख.

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 26/09/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही? नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का? ************************************************** आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली.

'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ!

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 26/09/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन अनेकांचे फोन, इमेल द्वारे एकच संदेश येत होता. ऑर्कुट उघडु नकोस. अकांउट हॅक होइल. (मिपामुळे तिकडे नसतोच मी). आज सकाळमधे सविस्तर बातमी आली आहे. 'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ! 'ऑर्कुट' या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर बॉम सबाडो नावाच्या 'बग'ने शनिवारी धुमाकूळ घातला. प्राथमिक माहितीनुसार हा 'बग' पासवर्ड हॅकर असून, तो संबंधित "ऑर्कुट'धारकाचे अकाऊंट हॅक करतो. 'ऑर्कुट'धारकांच्या स्क्रॅपबुकवर त्यांच्या मित्रगटातील व्यक्तीकडून 'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप येतो. इंटरनेट एक्‍सप्लोररमध्ये त्या स्क्रॅपवर क्‍लिक केल्यास एक्‍सप्लोरर हॅंग होते.