कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत
नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन.
मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच.
मिसळपाव