भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र
नुकतीच विकास यांच्या "गोईंग फॉरवर्ड" या धाग्यावर जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली.
त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार.
इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही.
मिसळपाव