Skip to main content

दिवाळी अंक प्रकाशन

लेखक मि माझी यांनी बुधवार, 29/09/2010 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक दिवाळी अंक प्रकाशीत करायचा आहे. पुण्यातल्या पब्लिकेशन हाउस बद्द्ल काही माहिती असल्यास सांगावे. धन्यवाद. मी माझी.

लतादिदी ची एक आठवण.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 29/09/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त्य अनेक लेख वाचण्यात आले आणि अनेक गाण्यांचा आस्वादही घेण्यात आला. १९६४ च्या सूमारास लतादिदींना गीतेच्या अध्यायावर गायन करण्यासाठी एका संगितमंडळीने सांगितले. लतादिदी आपल्या प्रघातानूसार त्यावर चिंतन, मनन आणि वाचनाची तयारी सुरु केली. उच्चारावर लतादिदींचे खास लक्ष असते. उच्चारात कोणताही दोष असु नये यासाठी त्यांनी गोनिंदा यांना तातडिने येण्यासाठी पत्र पाठविले. गोनिदा यांच्या देखरेखीखाली लतादिदी यांच्या सरावासाठी सुरवात झाली. लता एकनंतर एक असे अध्याय वाचत आणि गोनिंदा त्यात र्‍हस्व आणि दिर्घाच्या उच्चारात काही त्रुटी राहत तर नाही ना यावर लक्ष देत.

चौकट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 29/09/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
मळलेल्या वाटेवरुन मी जातो बागेतल्या त्या कोपर्‍याकडे गुलमोहोराखाली असलेल्या लाकडी बाकाकडे तिथे असतो गुलमोहोराच्या फुलांचा पखरण ल्यायलेला जमीनतुकडा. मला हे चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं चौकटबध्द मी चौकट टाकतो त्या चित्राभोवती. आता लाकडी बाक, मागे बहरलेला गुलमोहोर अन् त्याखालची लालरेशमी जमीन ...

माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 29/09/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी . धन्यवाद अमोल केळकर

मला पडणारे काही प्रश्न

लेखक एमी यांनी बुधवार, 29/09/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का? काही उदाहरणे
  1. मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो.

माझी - ती....

लेखक अथांग यांनी बुधवार, 29/09/2010 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी कुसुमिता ची 'ती' वाचली, आणि शेवटचा प्रश्न छळत राहीला - 'स्त्री' आहे ती आता, आता तिच्या स्वप्नांवर तिचा काय हक्क? वाटले याच्याही पुढे काहितरी असावे.

मराठी रॅप ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 28/09/2010 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा पोरगा लय भारी मराठी रॅप गातो. http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला. आता चर्चेचा मुद्दा: पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..) तुमच काय म्हणणे आहे ?