Skip to main content

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/10/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय!
काव्यरस

डूड...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 30/09/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
"लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय. वी विल कमेन्स आऽर डिसेंट शॉर्टली. यु आऽ रिक्वेस्टेड..." समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला. मान उंचावून दोन सीट सोडून डावीकडे असलेल्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली. विमान डावीकडे वळत होते. त्याबाजूला झुकल्यामुळे खाली चमचमणारा दिव्यांचा समुद्र अगदी लख्ख दिसत होता. सोळा सतरा तासाच्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. मस्त हात उंच करून त्याने आळस दिला. खिडकीच्या बाजूला शाय, आय मीन, शलाका काचेला नाक लावून खाली बघत होती. तिच्या बाजूला आई अगदी सराईतपणे घोरत होती.

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/09/2010 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता
सोडा हातातल्या हाता नाथा आता हातातल्या हाता अहो सोडा हातातल्या हाता नाथा हातातल्या हाता ||धृ|| मनाचीये गुंत्यामधे होssओssहोssओ मनाचीये गुंत्यामधे नका अडकू आता नाथा सोडा हातातल्या हाता ||१|| आले जरी दुरवरूनी आssआssआssआss आले जरी मोहीम करूनी का बळेची ओढता नाथा आता सोडा हातातल्या हाता ||२|| सासू सासरे दिर जावा हंssअंssअंssअंss सासू सासरे दिर जावा बोल बोलतील असे एकांती पाहता नाथा आता नका....नका सोडा हातातल्या ह
काव्यरस

ढबू मिरचीची पीठ पेरून भाजी

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 30/09/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी बसूनच काम केलं... संध्याकाळी बराच कंटाळा आला होता.... त्यात बेसन पेरून सिमला मिरची खायची इच्छा झाली. फ्रीज उघडून बघितला तर मिरच्या होत्या.. मस्तपैकी पीठ पेरून भाजी केली. ही घ्या कृती. साहित्यः १. ३-४ मोठे चमचे तेल २. १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून ३. २-३ सिमला मिरच्या चिरून ४. ३-४ मोठे चमचे चण्याचे पीठ ५. बरेच जण ह्यात कांदा घालत नाहीत. पण मला आवडतो म्हणून मी वापरला..त्यामुळे हवा असल्यास १ मोठा कांदा चिरून ६. फोडणीसाठी हिंग, मोहरी. जिरे, कडिपत्ता ७. अर्धा चमचा हळद ८.

माझं काय चुकलं?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 30/09/2010 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. सगळ अगदीच सामान्य. अशाच घरात माझा जन्म झाला.. लहानपणाचं आयुष्य आजुबाजुचं जग बघत बघत मोठं झालं, कधी गरीबी कधी श्रीमंती, म्हणजे कधी साधी भाजी पोळी तर कधी पुरणपोळी अशा अर्थाने. भारतात जन्म घेतलास म्हणजे मार्बल्स्,विटी-दांडू, क्रिकेट आवडायलाच हवे असा मनावर एक कोरला गेलेला ईतिहास, मला बास्केटबॉल आवडायचं. आयुष्य म्हणजे जे आपले आई-बाबा, शेजारी जगताहेत तेच असतं असा परिस्थितीचा आग्रह. पण मला हे कधीच पटत नव्हतं, हे असं नको- असं असायला हवं अशी माझी जिज्ञासा आणि अपेक्षा. त्यामुळे घरात आणि घरा बाहेर मी नेहमीच एक रेबल (ईंग्रजी).

स्वप्न : दुरुपयोग धर्माचा आणि गणिताचा

लेखक रन्गराव यांनी गुरुवार, 30/09/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
पितृ पक्षाच्या नावखाली धर्म आणि गणित ह्यांचा उपयोग करून कुरघोडी करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्यावर चिकित्सा करण्याचा हा एक उद्धट प्रयत्न. नुकताच कोणी तरि कौल घेवून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला हि अमूक महिन्यातील स्वप्ने एक योगायोग असतो. आणि कोणितरि ब्राह्मणास दक्षिणा देवून पितरांचे ऋण फेडले. तर दुसर्या कुणी ब्राह्मणाने इतर ब्राह्मणांनी कसे आपले हितसंबंध सांभळले ह्यावर लेख लिहिला. . ज्याने दक्षिणा घेतली त्याच ब्राह्मणाने लेख लिहिला नसला म्हणजे मिळवली. ;) धर्माचा दुरुपयोग ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. गणिताचा दुरूपयोग हा तसा नवीन भाग आहे. पाहूयात कसे ते.