Skip to main content

कोल्हापुरी मटण

लेखक आंबोळी यांनी रविवार, 03/10/2010 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो... लै दिवसानी मटण करायचा बेत ठरला आणि पाकृसाठी मिपाचाच दरवाजा ठोठवावा लागला... पाक्रुही झकास मिळाली.... स्वाती राजेश यांची संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा) सोबत थंडगार बीअर..... अहाहा.... पाकृ आणि सजावट : सौ. अंबोळी. फोटो घेणार / लेख टाकणार आणि ग्लास संपवणार : श्री. अंबोळी

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 02/10/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम
हिरो: तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब तुझ्या डोईचे केस हाय लांब तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग तू कोनाची प्वार हाय सांग ||१|| हिरोईन: तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२|| हिरो: तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चा
काव्यरस

पुण्य, की प्रायश्चित्त?...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/10/2010 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'... ... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला... आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो. पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला. 'वृद्धाश्रम'... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं.

माझी ओरिगामी

लेखक पिंगू यांनी शनिवार, 02/10/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे..

लाभले आम्हास भाग्य..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 02/10/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
'लाभले आम्हास भाग्य.. ' भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या.

हैदराबाद मध्ये राहण्या करिता मदत

लेखक अभिशेक गानु यांनी शनिवार, 02/10/2010 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझा एक मित्र हैदराबाद ला शिफ्ट होतो आहे कामा निमित्त, जर कोणाच्या ओळखीत खालील परिसराच्या आसपास काही राहण्याची सोय असल्यास जरूर कळवावे अमीर्पेत येल्लारेद्दीगुडा धन्यवाद अभिषेक

भारतीय इंग्रजी माध्यमांचे अनाकलनीय वर्तन

लेखक महानगरी यांनी शनिवार, 02/10/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला आणि माझ्यासारख्या अनेक भारतीय नागरिकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. बहुचर्चित रामजन्मभूमी - बाबरी मशिद वादात हिंदू गटांचा दावा मान्य करण्यात आला व वादस्त जागेची मालकीही सोपवण्यात आली. सुन्नी वक्फ़ बोर्डास १/३ जागेची मालकी देण्यात आलेली असली तरी हा निकाल सर्वसाधारणत: हिंदूंच्या बाजूने लागल्याचे दिसते. लोकशाही ही बहुसंख्यांच्या मताचा/भावनेचा आदर करण्यासाठी राबवली जाते. न्यायालयाचा निर्णय हा इतर पुराव्यांच्या उपलब्धी/अनुपलब्धी बरोबरच बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करणारा आहे.