गोळ्यांची आमटी/सांबार..
नाही.. नाही.. रस्ता नाही चुकला. अहो मी ही स्वयंपाक करतेच की घरी..! असो..
डिस्क्लेमर : ही ऑथेंटीक पा कृ नाही. अशीच सांगोवांगी आणि थोडीफार जयश्री देशपांडे यांच्या कृपेने जे काही घरात होतं ते वापरून केलेली आहे. प्राजु श्टाईल म्हणा हवं तर!! ऑथेंटीक पाकृ साठी सुगरणींची आणि बल्लवाचार्यांची मदत घ्यावी. काही चुकले-माखल्यास मी जबाबदार नाही.
मिसळपाव
साहित्य
१२ मोठे बटन मशरुम्स
२ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा
२ टे. स्पून बारीक चिरून बेल पेपर
६-८ सोलून साफ केलेल्या कोलंब्या
१/२ टी स्पून मिरे बारीक करुन
१/४ टी स्पून इटालिय सिझनिंग ब्लेंड
२ टे. स्पून परमेजान चीज
१/२ कप मोत्झारेला चीज
१ टी स्पून तेल
कृती
ओवन ३५०फॅ. ला तापत लावा. मशरूमचे देठ काढा. त्यातील ४ देठ बारीक चिरुन घ्या. कोलंब्या बारीक चिरुन घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले तापले की त्यात तेल घाला. कांदा,मशरुमचे देठ घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात बेलपेपर घालून २-३ मिनिटे परता.