Skip to main content

२ दिवस अक्षरभारती सोबत.

लेखक sandeepn यांनी मंगळवार, 12/10/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
        २ ऑक्टोबर ला अक्षरभारतीच्या टीम सोबत ग्रंथालय उभारण्यासाठी जाण्याची संधी आली. अक्षरभारतीच्या कामाची मला तशी सगळी माहीती होती पण प्रत्यक्षात काम करण्याचा योग आला नव्हता. म्हणुन यावेळेस आलेली संधी मि सोडली नाही.         अक्षरभारती ही एक NGO आहे जी गरजु शाळांमधे जावुन त्यांना ग्रंथालय स्थापुन देते. बरयाचशा शाळांमधे अशी ग्रंथालये नसतात,तेथील मुलांमधे वाचनाची आवड निर्मान व्हावी या द्रुष्टीने अक्षरभारती प्रयत्न करते. अवांतर वाचनाची पुस्तके या ग्रंथालयात असतात.

पुस्तकविश्वचा दिवाळी अंक

लेखक आनंदयात्री यांनी मंगळवार, 12/10/2010 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पुस्तकविश्वचा दिवाळी अंक निघावा असा मानस आहे. पुस्तकविश्व हे संस्थळ 'पुस्तक' या एकाच विषयाला वाहिलेले असल्याने आपल्यात विषयाचे बंधन जरी असले, तरी त्यातही अधिकाधिक वैविध्य साधायचा मानस आहे. पण अर्थातच हे तुम्हा सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही.

माझा नवरा पैसं खातो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/10/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझा नवरा पैसं खातो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो अहो खातो माझा नवरा पैसं खातो जातो जातो माझा नवरा मुन्शिपाल्टीत कामाला जातो ||धृ|| आठवड्याला नवी साडी घेई पोराबाळांना खावू रोज देई पण दारू लई जास्त पितो खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो जातो जातो नवरा पोलीस श्टेशनात कामाला जातो ||१|| रस्त्यावर तो उभा राहतो शिट्टी मारून लायसन पाहतो पावतीचं पैसं खिशात टाकतो खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो जातो जातो नवरा ट्र
काव्यरस

पाहुणेर

लेखक शरद यांनी मंगळवार, 12/10/2010 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुणेर प्रत्यक्षातले विश्व, कवीच्या कल्पनेतले विश्व तसेच आणखी एक विश्व कवितेत आढळते,भावविश्व. शाळेत आपण शिकलेल्या कविता प्रत्यक्षातल्या विश्वाचे काव्यात्वक वर्णन केलेल्याच असत. जरा नंतरच्या काळात कल्पनेतले विश्वही परिचयाचे होऊं लागते. उदाहराणर्थ "शाळेस रोज जातांना, मज विघ्ने येती नाना" या कवितेपासून "फूलराणी"चे कल्पनेतील विश्वही आपल्या परिचयाचे झालेले असते.भावविश्वाची ओळख जरा मोठेपणी, जाणून उमजून कविता वाचावयाला सुरवात केल्यावरच होऊं लागते.त्यातही ज्यांना "भावगीते" म्हणतात तीच जास्त परिचयाची असतात.

चवींचा "जिव्हा" ळा...... माझ्या मनातला!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 12/10/2010 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी लेकीला मस्त भुक लागली होती. कूकर नुकताच झाला होता. पटकन तिला तूप मेतकूट भात कालवून द्यावा असं वाटलं. म्हणून कूकर उघडला..आहाहा...मस्त आंबेमोहोर चा जिवघेणा गंध नाकात शिरला. (उपासाच्या वेळी असले वास जरा जास्तच जिवघेणे वाटतात) तिच्या नेहमीच्या प्लेट मध्ये काढला.त्यावर भरपूर साजुन तुप ओतले.साधारण ४-५ चमचे.मग तो आं.मो.चा गंध अधिकच गहिरा झाला .....त्यात साजुक कणीदार तूप अस मस्त शिरत होतं....आणि त्या तुपाचा रवाळपणा पहिल्या वाफेच्या भाताच्या ताज्या ताज्या गरम पणामुळे असा प्रेमानं विरघळत होता.......आहाहा.... चवीपुरतं मीठ घातलं आणि मेतकूटाची बरणी(आईने दिलेली) काढली.

प्रेम..जगावेगळे...

लेखक अथांग यांनी मंगळवार, 12/10/2010 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, या कवितेला नाव सुचत नाहीये किंवा जे सुचलेय ते रुचत नाहीये. मदत कराल प्लीज ? तिने चांगलाच धरला हट्ट.... म्हणाली, कसही कर आणि दे मला.. तुझ्या टपोर अक्षरमोत्यांची भेट.. युगं उलटलीत त्यांना बघून.. भकासलेल्या डोळ्यांत साठवून मिरवेन त्यांना दागिन्यासारखे, मग डोळेही माझे चमकतील बघ एका वेगळ्याच तेजाने.. ..... ....... त्यालाही आणायचेच होते परत तिच्या डोळ्यातील हरवलेले ते झळाळ-क्षण.. मनातील सर्व भावभावनांना गुंफित अक्षरमोत्यात त्यानेही मग उधळून दिले.. त्याच्याकडे होते-नव्हते ते सगळे.. कोणा-कोणालाच कळले नाही, हे प्रेम त्यांचे जगावेगळे !!

जाल आणि कायद्याचे हात

लेखक शुचि यांनी सोमवार, 11/10/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जालावर जे प्रकरण गाजतय ते म्हणजे - http://abcnews.go.com/US/california-student-finds-fbi-tracking-device-c… यासीर अफीफी हा अमेरीकेचा नागरीक असलेला , मुस्लीम युवक जेव्हा त्याच्या कारची तपासणी करण्यासाठी, ऑईल बदलण्यासाठी म्हणून मे़अ‍ॅनिककडे गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याला लोहचुम्बकाने चिकटवलेलं एक यंत्र कारखाली लावलेलं सापडलं. त्याने ते यंत्र त्याच्या मित्राला दाखवलं. मित्राने एका संस्थळावर त्या यंत्राची छायाचित्रं केवळ कुतुहलाने प्रसिद्ध केली.