Skip to main content

अजून काय...

लेखक असुर यांनी शुक्रवार, 15/10/2010 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय! महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय! आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय! एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत द

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटः रामजोशी गीतकारः ग.दि.मा. सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग.. ************ सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी.. जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं.... *************** सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि

आज या कातरवेळी तिची आठवण का होतेय?

लेखक स्वप्निल मन यांनी शुक्रवार, 15/10/2010 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे पलीकडे एक सुंदर पहाट फुलणार आहे इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवली आहे इतके दिवस या आठवणी दडपून टाकल्या होत्या मग आजच का या पुन्हा आठवू पाहात आहेत? उद्या काहीतरी घडणार आहे का? माझ्या प्रिय व्यक्तीला काही होणार तर नसेल ना? देवा, तिला नेहमी आनंदात ठेव काढत नसेल माझी आठवण तरी सुखात ठेव माझ्या आठवांच्या लहरी तिच्यापर्यंत पोहोचू नको देऊस मन माझे रडले तरी तिला ऐकू नको येऊ देऊस विसरून गेली मला तरी सुद्धा चालेल पण भेट जर कधी झाली तर ओळख मात्र दाखव -स्वप्निल
काव्यरस

बुठ्ठी

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 15/10/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ती पहिलीच नोकरी होती. त्यावेळी मी मेडिकल इलेक्टॉनिक्स या क्षेत्रात काम करत होतो. मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी ऑपरेशन थिएटर व आयसीसीयुला लागणारी इलेक्टॉनिक मशिन पुरवायची. माझ काम होत, त्या मशीनची देखभाल करणं व ही मशीन कशी वापरायची त्याच ट्रेनिंग देणं. त्यामुळे हॉस्पिटलशी सतत संपर्क यायचा. असाच एकदा केईएम्‌ मधुन सकाळीच फ़ोन आला, एक ऑपरेशन चालू होणार होतं व त्यांना आमच्या कंपनीनी दिलेल्या "बलुन पंप" या मशिनची गरज लागणार होती. त्यावेळी हे मशिन नुकतच या हॉस्पिटलनी विकत घेतलेल होत. ते कस वापरायच याचं ट्रेनिंग पूर्ण दिलेल नव्हत.

अभिनंदन...

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 15/10/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
होईल की नाही, झाले तर कसे होईल, कुणी भाग घेईल की नाही आणि अशाच अनेक वादांच्या भोवर्‍यात सापडलेली १९वी राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची पार पडली. केवळ पारच पडली नाही तर भव्य दिव्य स्वागत आणि सांगता समारोह, भारतीय स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि इतर अनेक भुषणास्पद गोष्टींमुळे ही स्पर्धा कायम स्मरणात राहिल. सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन ! भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !! जय हिंद !!

यूपीएससी साठी 'मराठी साहित्य' विषयाचे मार्गदर्शन हवे आहे (तत्काळ).

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 15/10/2010 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र / मैत्रीणींनो.. आमची एक बेस्ट फ्रेंड केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परिक्षा या वर्षी देऊ इच्छिते. तीने सदर परिक्षेसाठी मराठी साहित्य या विषय मुख्य परिक्षेकरता वैकल्पिक म्हणुन घेण्याचे ठरवले आहे. तिचे माध्यमिक शिक्षण गोरेगाव, मुंबई इथल्या अ. भि. गोरेगावकर शाळेत झाले आहे. तिचे मराठी साहित्याचे सुरवातीपासुन म्हणाजे अगदी शालेय जीवनापासुन वाचन अफाट आहे. तिने मला अशी विचारणा केली आहे की, उपरोल्लिखित परिक्षेकरता मराठी साहित्य या विषया करता कोणी अनुभवी आणि एक्सपर्ट मार्गदर्शक आहे का?

सुरंगीची वेणी, ज्यूटची पिशवी आणि गोल्डफिशचा साबण

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 15/10/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
"गोव्याहून तुझ्यासाठी काय आणू? " माझा हा प्रश्न आमच्या नातेवाईकांना, परिचितांना एव्हाना तोंडपाठ झाला होता. आयुष्यातील पहिलीवहिली शाळेची लांब पल्ल्याची सहल. माझा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. जो भेटेल त्याला ह्या आगामी गोवा सहलीचे इत्यंभूत वार्ताकथन होत होते. आम्ही काय काय स्थळे पाहणार, कोणकोणत्या बीचवर जाणार, कसा प्रवास करणार.... एक ना दोन! आणि सर्व स्वयंस्फूर्त माहितीची गाडी "तुझ्यासाठी काय आणू? " ह्या प्रश्नावर येऊन थांबायची. अर्थात मला नाही तरी इतरांना माझ्या आईवडीलांच्या खिशाची काळजी होती म्हणा! त्यामुळे बहुतेक सगळेजण "तुला आवडेल ते आण," अशा जुजबी बोलण्यावर माझी बोळवण करत होते.